नेहराला पाहण्यासाठी 'ती' महिला क्रिकेटपटू अनेक तास 'ताज'बाहेर उभी होती अन् मग...

Ashish Nehra Love Story: आशीष नेहरा  (Ashish Nehra) हा भारताच्या क्रिकेट इतिहासामधील काही सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. आशीष नेहरा हा काही आठवड्यांपूर्वी गुजरात टायटन्सच्या संघाबरोबर मेन्टॉर म्हणून दिसून आला. आशीष नेहराच्या क्रिकेट करिअरप्रमाणेच त्याची लव्हस्टोरीही फारच रंजक आहे. अगदी एखादी फिल्मी स्टोरी वाटावी अशी ही लव्ह स्टोरी नेमकी आहे तरी कशी पाहूयात...

| Jun 18, 2023, 14:31 PM IST
1/16

Ashish Nehra Rushma Nehra Love Story

आशीष नेहराची वेगळी ओळख करुन देण्याची तशी काही गरज नाही. भारतीय संघात असताना त्याची कामगिरी आणि त्यानंतर त्याच्या मार्गदर्शनाखाली गुजरात जायंट्सने पहिल्याच पर्वात जिंकलेला आयपीएल चषक त्याच्याबद्दल सांगण्यासाठी पुरेसा आहे.

2/16

Ashish Nehra Rushma Nehra Love Story

आपल्या वेगवान गोलंदाजीने फलंदाजांची भंबेरी उडवणारा आशीष नेहरा तितकाच चांगला प्रशिक्षकही आहे.

3/16

Ashish Nehra Rushma Nehra Love Story

त्याचबरोबर आशीष नेहराने कॉमेन्ट्री बॉक्समधूनही आयपीएलवर छाप पाडल्याचं पहायला मिळालं.

4/16

Ashish Nehra Rushma Nehra Love Story

आशीषने भारतीय संघासाठी 164 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने 176 डावांमध्ये 235 विकेट्स भारतासाठी घेतल्या. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 44 आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये 157 विकेट्स घेतल्या आहेत. टी-20 मध्ये त्याने 34 विकेट्स घेतल्यात.

5/16

Ashish Nehra Rushma Nehra Love Story

आशीष नेहराची लव्हस्टोरीही त्याच्या करिअर इतकीच रंजक आहे. नेहराच्या पत्नीचं नाव रुश्मा असं आहे.

6/16

Ashish Nehra Rushma Nehra Love Story

आशीष नेहरा 2002 साली इंग्लंडच्या दौऱ्यावर असताना क्रिकेटर असलेल्या रुश्मा आणि त्याची पहिल्यांदा भेट झाली होती.

7/16

Ashish Nehra Rushma Nehra Love Story

रुश्मा नेहरानेच त्यांची लव्हस्टोरी एकदा चाहत्यांबरोबर शेअर केली होती.

8/16

Ashish Nehra Rushma Nehra Love Story

आशीष नेहराची एक झलक पाहता यावी म्हणून आपण अनेक तास हॉटेलबाहेर थांबलो होतो असं रुश्माने सांगितलं होतं.  

9/16

Ashish Nehra Rushma Nehra Love Story

आपण आशीषच्या प्रेमात बुडालो होतो असं सांगताना रुश्माने भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असतानाच भारतीय संघ वास्तव्यास असलेल्या हॉटेलबाहेर आमची पहिल्यांदा भेट झाल्याचं सांगितलं. लंडनमधील ताज हॉटेलमध्ये ही भेट झाली होती.

10/16

Ashish Nehra Rushma Nehra Love Story

मी त्याचा ऑटोग्राफ घेतला. त्यावेळेस मी नाजूक हसले होते, त्यानंतर माझं आयुष्य बदलून गेलं अशी आठवण रुश्माने सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमधून सांगितली.

11/16

Ashish Nehra Rushma Nehra Love Story

लग्नाआधी आशीष नेहरा आणि रुश्माने जवळजवळ 7 वर्ष एकमेकांना डेट करत होते.

12/16

Ashish Nehra Rushma Nehra Love Story

7 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.

13/16

Ashish Nehra Rushma Nehra Love Story

आशीष आणि रुश्मा 2009 मध्ये विवाहबंधनात अडकले.

14/16

Ashish Nehra Rushma Nehra Love Story

रुश्मा आशीषच्या प्रेमात पडली मात्र प्रपोज आशीषनेच तिला केलं.

15/16

Ashish Nehra Rushma Nehra Love Story

आशीष आणि रुश्मा यांना आता 2 मुलं आहेत.

16/16

Ashish Nehra Rushma Nehra Love Story

आशीष आणि रुश्माच्या मुलाचं नाव आरुश आहे तर मुलीचं नाव अरियना आहे.