Astrology Tips: चुकूनही 'या' गोष्टींचं दान कधीही करू नये, गरीबी पाठ सोडणार नाही!

Astrology Tips for Daan: सनातन धर्मात दान करण्याची प्रथा गेल्या अनेक शतकापासून चालत आलीयेत. दान करणं पुण्याचं आहे. शास्त्राप्रमाणे, प्रत्येक व्यक्तीने कमाईचा दहावा भाग दान केला पाहिजे. याच्या आशीर्वादाने पापांचा नाश होतो शिवाय पुण्य कर्मांमध्ये वाढ होते. मात्र अशा काही गोष्टी आहेत ज्या दान करू नयेत. असं केल्याने देवी लक्ष्मीचा कोप होतो आणि तुमच्या जीवनात दारिद्र्य येऊ शकतं.

Jan 08, 2023, 20:36 PM IST
1/5

गरजूंना दान केल्याने पुण्य मिळतं असं म्हटलं जातं. मात्र दुःखी मनाने कधीही दान करू नये, अशाने पुण्य व्यर्थ जातं.

2/5

झाडू हे लक्ष्मीचं प्रतीक असतं असं मानलं जातं. अशा स्थितीमध्ये झाडू कधीही दान करू नये असं म्हणतात. यामुळे माता लक्ष्मी नाराज होऊ शकते. 

3/5

कोणत्याही प्रकारचं वापरलेलं तेल कधीही दान करू नये. यामुळे शनिदेवांना राग येतो.

4/5

दान करताना भांडं कोणतं आहे याची काळजी घ्यावी. पितळ, चांदी, तांबे हे धातू शुभ मानले जातात. या धातूंनी बनवलेली भांडी दान करणं योग्य मानलं जातं. तर प्लास्टिक, स्टील, अॅल्युमिनियम तसंच काचेची भांडी दान करू नये  

5/5

अनेकदा आपण अन्न दान करतो, मात्र शिळं अन्न कधीही दान करू नये. त्यामुळे घरात गरिबी येऊ शकते.