Athiya KL Rahul Wedding: अथिया आणि केएल राहूलच्या लग्नाचे Unseen Photo आले समोर

Athiya KL Rahul Wedding Inside Photos : बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (athiya shetty) आणि टीम इंडिय़ाचा स्टार फलंदाज केएल राहुल (kl rahul) 23 जानेवारीला लग्नबंधनात अडकले आहेत. या लग्नात बॉलिवूडमधील अनेक दिग्गज स्टार आणि टीम इंडियाचे स्टार खेळाडू उपस्थित होते. 

Jan 25, 2023, 20:49 PM IST

Athiya KL Rahul Wedding Inside Photos : बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (athiya shetty) आणि टीम इंडिय़ाचा स्टार फलंदाज केएल राहुल (kl rahul) 23 जानेवारीला लग्नबंधनात अडकले आहेत. सुनील शेट्टी यांच्या खंडाळ्यातील बंगल्यावर हा शाही विवाह सोहळा पार पडला. या लग्नात बॉलिवूडमधील अनेक दिग्गज स्टार आणि टीम इंडियाचे स्टार खेळाडू उपस्थित होते. लग्न पार पडल्यानंतर अनेक फोटो समोर आले होते. मात्र काही फोटो अद्याप बाकी होते. हेच फोटो आता समोर आले आहेत. 

1/5

kl rahul wedding

लग्नातील या फोटोमध्ये आथियाचा भाऊ अहान तिच्या लाडक्या बहिणीचा हात धरून तिला मंडपात घेऊन जाताना दिसत आहे. याच फोटोत अथिया हसताना दिसली.  

2/5

kl rahul wedding

या फोटोमध्ये अथिया आणि केएल राहुल मंडपात बसले आहेत. त्यावेळी अहान शेट्टी हातात पूजेचे ताट धरून विधी करताना दिसत आहे.  

3/5

kl rahul wedding

दरम्यान हा फोटो शेअर करत अहानने लिहिले की, 'मी तुम्हा दोघांवर खूप प्रेम करतो. तुम्हा दोघांना खूप आनंद मिळो आणि प्रेम असेच राहो.अहानच्या या पोस्टवर अथियाने हार्ट आयकॉन शेअर केला आहे.

4/5

kl rahul wedding

हा फोटो अथिया आणि केएल राहुलच्या लग्नानंतरच्या मंडपाचा आहे. या फोटोमध्ये वधू आणि वर बसलेले दिसत आहेत तर सुनील शेट्टीसह पत्नी माना आणि केएल राहुलचे पालकही या जोडप्यांवर फुलांचा वर्षाव करताना दिसत आहेत.

5/5

kl rahul wedding

या फोटोत सुनील शेट्टी आणि माना शेट्टी भावूक झाले होते. या फोटोमध्ये दोघेही मुलीला मिठी मारताना दिसत आहेत.