फार जुना नाही... लॉकडाऊन आधी तयार झालाय माथेरानमधील कड्यावरचा गणपती

कड्यावरचा गणपती सध्या चांगलाच लोकप्रिय होत आहे. अनेक पर्यटक येथे भेट देत आहेत. 

Sep 26, 2023, 22:35 PM IST

kadyavarcha ganpati matheran : माथेरान हे महाराष्ट्रातील सर्वात छोट आणि इतिशय सुंदर असे हिल स्टेशन आहे. मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतारवर असल्यामुळे पर्यटक येथे मोठ्या संख्येने भेट देतात.  माथेरानमधील कड्यावरचा गणपती देखील सध्या चांगलाच लोकप्रिय होत आहे.

1/7

माथेरान हे निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. याच निसर्गाच्या सानिध्यात  कड्यावरचा गणपती विराजमान झाला आहे. 

2/7

नेरळ स्टेशनवरुन माथेरानला जायला टॅक्सी उपलब्ध आहेत. तसेच टॉय ट्रेनने देखील जाता येते. माथेरानच्या घाटात मद्यात उतरून चालत अर्धा तासात कड्यावरचा गणपतीकडे जाता येते. नेरळ ते माथेरान 22 किमी. चे अंतर आहे. टॅक्सीने  माथेरानला पोहोचण्यास 20 मिनिटे लागतात. 

3/7

मूर्तीच्या अवतीभोवती असणारे डोंगर, आणि निसर्गाचे सौंदर्य पाहून डोळ्याचं पारण फिटते.  

4/7

 येथे 14 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर 2018 साली 52 फूट उंच कड्यावरचा गणपती साकरण्यात आला. हा गणपती निसर्गराजा कड्यावरचा गणपती नावाने देखील ओळखला जातो.  

5/7

राजाराम खडे 1998 पासून नेरळ-माथेरान दरम्यान मिनी ट्रेन चावत होते. यावेळी त्यांना पेब किल्ल्याजवळच्या कड्याच्या आकारात गणपतीच्या प्रतृकृतीचा भास झाला. ग्रामस्थांना त्यांनी आपला अनुभव सांगितला.  येथे गणपतीची प्रतिकृती उभारण्याची कल्पना त्यांनी ग्रामस्थांना सांगितली.

6/7

नेरळ-माथेरान दरम्यान मिनी ट्रेनचं इंजिन चालवणा-या राजाराम खडे यांच्या प्रयत्नातून हा गणपती साकारला आहे. गणपती शेजारी उंदीर देखील आहे. 

7/7

कड्यावरचा गणपती फार जुना नाही. 2018 साली 52 फूट उंच असा कड्यावरचा गणपती पूर्णत्वास आला.