22 व्या वर्षातच टॉड मर्फीची एकच चर्चा; 11 वर्षानंतर ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये घडलं असं की...

ऑस्ट्रेलियाचा 22 वर्षीय युवा फिरकी गोलंदाज मर्फीने भारताविरूद्धच्या सामन्यात 5 विकेट घेतल्यात. इतकंच नाही तर त्याने चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि केएल राहुलसारख्या मोठ्या फलंदाजांना पव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे.

Feb 10, 2023, 23:05 PM IST
1/5

भारताविरुद्ध डेब्यू करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा ऑफस्पिनर टॉड मर्फीने नागपूर टेस्टच्या दुसऱ्या दिवशी उत्तम कामगिरी केली. मर्फीने भारताच्या पहिल्या डावात 5 विकेट्स घेतल्या. यासह त्याने एका विशेष यादीत स्थान मिळवलंय.  

2/5

मर्फीने केएल राहुल, रविचंद्रन अश्विन, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि केएस भरत यांना माघारी धाडलं. कसोटी पदार्पणात एका डावात 5 बळी घेणारा तो चौथा ऑस्ट्रेलियन ऑफस्पिनर आहे.

3/5

पीटर टेलरने 1986-87 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सिडनी टेस्टमध्ये 78 रन्समध्ये 6 विकेट्स घेतले होते. अशी कामगिरी करणारा तो पहिला ऑस्ट्रेलियन ऑफस्पिनर ठरलाय.

4/5

2008 मध्ये भारत दौऱ्यावर आलेल्या जेसन क्रेझानेही नागपूर टेस्टमघ्ये पदार्पण केलं. यावेळी पहिल्या डावात 215 रन्स देत 8 विकेट्स घेतले होते.

5/5

ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा दिग्गज ऑफस्पिनर नॅथन लायननेही हा पराक्रम केलाय. 2011 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या गाले टेस्टमध्ये लायनने 34 रन्समध्ये 5 विकेट्स घेतले होते.