Upcoming SUVs: भारतात या वर्षी लॅच होणाऱ्या 5 SUV आणि त्यांचे हटके फिचर्स, पाहा

भारतात SUV कारच आवडणारा एक मोठा वर्ग आहे. ग्राहकांची आवड आणि मागणी लक्षात घेता कार उत्पादक कंपन्यां नवनविन SUV कार बाजारात आणत असतात. सध्या भारतात 108 प्रकारच्या SUV गाड्या आहे. यावर्षी भारतात 5  SUV गाड्या लाँच होण्याची शक्यता आहे. पाहुयात या 5 SUV गाड्या आणि त्यांचे कमाल फिचर्स

| Jun 27, 2023, 19:02 PM IST

Upcoming SUVs in India : भारतात SUV कारच आवडणारा एक मोठा वर्ग आहे. ग्राहकांची आवड आणि मागणी लक्षात घेता कार उत्पादक कंपन्यां नवनविन SUV कार बाजारात आणत असतात. सध्या भारतात 108 प्रकारच्या SUV गाड्या आहे. यावर्षी भारतात 5  SUV गाड्या लाँच होण्याची शक्यता आहे. पाहुयात या 5 SUV गाड्या आणि त्यांचे कमाल फिचर्स

1/5

Kia Seltos

कियाने अगदी कमी कालावधीत बाजारात आपलं स्थान निर्माण केलं आहे. आता नव्या रुपात पुन्हा बाजारात येण्यसाठी सज्ज झालीय. डिझाईन केलेले एलईडी हेडलॅम्प, नवीन बंपर आणि नवीन टेल-लॅम्पसह ही गाडी आकर्षक दिसत आहे. आतील भागात नवीन 10.25-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि रोटरी गीअर सिलेक्टरसह  रिडिझाइन केलेले सेंटर कन्सोलसह अपग्रेड करण्यात आले आहेत. 

2/5

HYUNDAI EXTER

नव्या HYUNDAI EXTER मध्ये ड्युअल कॅमेर्‍यासह डॅशकॅम आणि 2.31-इंचाचा डिस्प्ले देण्या आला आहे. यात 6 एअरबॅग्ज आणि सनरुफ आहे. इतर वैशिष्ट्यांमध्ये ESC, हिल असिस्ट कंट्रोल, 3-पॉइंट सीट बेल्ट आणि सर्व सीटसाठी सीटबेल्ट रिमाइंडर आहेत. याशिवाय पार्किंग सेन्सर्स, स्वयंचलित हेडलॅम्प आणि मागील पार्किंग कॅमेरा यांचा समावेश आहे.

3/5

Honda Elevate

Honda Elevate मध्ये वन-टच ऑपरेशनसह इलेक्ट्रिक सनरूफ, सहा एअरबॅग्ज, EBD आणि ब्रेक असिस्टसह  हिल स्टार्ट असिस्ट, मल्टी-एंगल रिअर कॅमेरा, अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल अशी वैशिष्ट्ये आहेत.Honda Elevate 1.5-liter i-VTEC DOHC पेट्रोल इंजिनसह उपलब्ध असेल

4/5

Citroen C3 Aircross

या SUV मध्ये सहा-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन पर्यायासह 1.2 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे.  स्मार्टफोन-अनुकूल 10-इंच टचस्क्रीन प्रणालीसह सुसज्ज आहे. इन्फोटेनमेंट सिस्टममध्ये एकाधिक कनेक्टिव्हिटी वैशिष्ट्ये आणि 5 चार्जिंग यूएसबी आणि चार्जिंग सॉकेट आहेत.

5/5

FORCE GURKHA

FORCE GURKHA SUV ला LED DRL च्या रिंगने वेढलेले गोल हेडलॅम्प मिळतात. बुल गार्ड जोडल्याने वाहनाला अधिक दमदार रुप मिळतं. पहिल्यांदाच यात पाच दरवाजे असणार आहेत. सहा सीटर या कारमध्ये सुरुवातील दोन, मध्ये दोनआणइ तिसऱ्या रांगेत एक बेंच सीट देण्यात आली आहे.