बाईक घेण्याची तुमची इच्छा आता आम्ही पुर्ण करणार... जाणून घ्या कसं

आज आम्ही तुम्हाला अशा 5 बाईक विषयी माहिती सांगणार आहोत ज्यांचा लुक आणि पावर जबरदस्त आहे. चला तर मग जाणून घेऊयात...

Jul 29, 2022, 19:13 PM IST

Top 5 bikes under 1.50 lakh : जर तुम्ही बाईक घेण्याचा विचार करत असाल? आणि तुमचं बजेट हे 1.50 लाख रुपयांचं असेल तर आज आम्ही तुम्हाला अशा 5 बाईक विषयी माहिती सांगणार आहोत ज्यांचा लुक आणि पावर जबरदस्त आहे. चला तर मग जाणून घेऊयात...

1/5

TVS Ronin

नुकतीच TVS ने Ronin ही बाईक लाँच केली आहे.  Ronin बाईकला scrambler फॉरमॅटमध्ये बनवलं आहे. या बाईकला 225cc इंजिन आहे जो 20PS ची पावर आणि 19.93 Nm चा पीक टॉर्क जनरेट करु शकतं. या बाईकची किंमत 1.49 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरु होते.

2/5

Hero Xpulse 200 4V

Hero Xpulse 200 4V ही बाईक आॉन-रोड आणि ऑफ रोड दोन्ही प्रकारच्या राइडिंगसाठी बनवली आहे. याबाईकमध्ये 199.6cc चं इंजिन मिळतं, जे 18.8 bhpची पावर आणि 17.35 Nmचं टॉर्क जनरेट करतं. या बाईकचं वजन 158 किलो आहे तर या बाईकची किंमत 1.36 लाख रुपयांपासून (एक्स-शोरुम) सुरु आहे.

3/5

Bajaj Pulsar NS200

Bajaj Pulsar NS200 या बाईकला ट्रिपल स्पार्क DTS-i 4V FI 6-स्पीड गिअरबॉक्स इंजिन सोबत येतं. यामध्ये 199.5cc इंजिन लिक्विड कूलिंग सिस्टिम मिळते. हे इंजिन 24.5 PS पावर आणि 18.74 Nm इतकं पीक टॉर्क जनरेट करतं. या बाईकची सुरुवातीची किंमत ही 1.42 लाख रुपये(एक्स-शोरुम) इतकी आहे.

4/5

Honda CB200X

Honda CB200X या बाईकमध्ये 184.4ccचं इंजिन आहे. जे 17 hp पावर आणि 16.1 Nm पीक टॉर्क जनरेट करतं. या इंजिनला 5-स्पीड गिअरबॉक्स सोबत जोडलं आहे. या बाईकची सुरुवात 1.47 लाख रुपयांपासून (एक्स-शोरुम) सुरु होते.

5/5

TVS Apache RTR 200

TVS ने Apache RTR 200 4V या बाईकला मागच्या वर्षी लाँच केलं आहे. या बाईकमध्ये 197.75 cc इंजिन दिलं आहे, जे 20.82 PS पावर आणि 16.8 Nm इतकं पीक टॉर्क जनरेट करतं. या बाईकची किंमत 1.40 लाख रुपयांपासून (एक्स-शोरुम) सुरु होते.