JRD Tata बद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहितीयत? जाणून घ्या त्यांच्यासंदर्भात मनोरंजक Facts

JRD Tata Birthday : जेआरडी टाटा (JRD Tata) यांचा जन्म 29 जुलै 1904 ला झाला. त्यांच्या जयंतीच्या (JRD Tata Birth Anniversary) निमित्ताने आज त्यांच्या जीवनाशी निगडीत असणाऱ्या 5 इंटरेस्टिंग फॅक्ट बद्दल जाणून घेऊया...

Jul 29, 2022, 16:43 PM IST

JRD Tata Birthday : विमान वाहतूक क्षेत्रात (Indian Aviation Sector) आज भारताने जो मान मिळवला आहे त्याचं श्रेय जहांगीर रतनजी दादाभाई टाटा (JRD Tata) यांना जातं. 'फादर ऑफ इंडियन एविएशन' (Father of Indian Aviation) म्हणून जेआरडी टाटांची ओळख आहे. 1932ला जेआरडी टाटांनी एअरलाईन्सच्या क्षेत्राची पायाभरणी केली. ही देशाची पहिली एअरलाईन्स होती, जिने कराचीतून मुंबईसाठी पहिली भरारी घेतली. या व्यतिरिक्त त्यांनी टाटा मोटर्स सारख्या कंपन्यांची पायाभरणी केली. 

1/5

जेआरडी यांचा जन्म पॅरिसला झाला होता

JRD Tata यांचा जन्म पॅरिस (फ्रांस) ला झाला होता. जेआरडी टाटा यांचं शिक्षण हे फ्रान्स, जपान आणि इंग्लंडला झालं होतं. त्यांनी फ्रेंच आर्मीमध्ये 1 वर्षाची सेवा देखील  केली होती.

2/5

जेआरडी यांचं फ्रेंच भाषेवर प्रभुत्व होतं

असं सांगितलं जातं की जेआरडी टाटा यांना इंग्रजीच्या तुलनेत फ्रेंच अधिक चांगल्या पद्धतीने बोलता येत होतं. भारतातील इतर भाषांच्यापेक्षा फ्रेंच आणि इंग्रजी भाषेवर अधिक प्रभुत्व होतं.

3/5

फिटनेस प्रेमी जेआरडी टाटा

जेआरडी टाटा त्यांच्या फिटनेसच्या बाबतीत फार अॅक्टिव्ह होते. वयाच्या 80 व्या वर्षीसुद्धा ते व्यायाम करत होते. त्यांना वेट ट्रेनिंग सोबतच गोल्फसुद्धा खेळला आहे. जेआरडी टाटांना त्यांच्या फिजिशियन आणि कॉर्डियोलॉजिस्ट यांनी प्रश्न विचारला होता की, ''तुम्ही किती पुश-अप्स करता?'' यावर उत्तर देताना 20 पुश-अप्स मारतो असं उत्तर जेआरडींनी दिलं. तेव्हा त्या डॉक्टरांनी मी तर 10 पेक्षा जास्त नाही पुशअप्स मारु शकत असं उत्तर जेआरडींना दिलं.

4/5

40 हजारांपेक्षा जास्त पत्र लिहिले

जेआरडी टाटा यांनी त्यांच्या जीवनात 40 हजारांपेक्षा जास्त पत्र लिहिले. देशातल्या जवळपास सर्व भागांतील विद्यार्थी जेआरडी टाटा यांना पत्र लिहून त्यांचं मार्गदर्शन घेत असंत. 1989 च्या फेब्रुवारीला एका विद्यार्थ्याने त्याच्या जीवनातील अडचणींसंबंधीत मार्गदर्शन मागितलं होतं. त्यावेळी जेआरडी टाटा प्रवासात होते. त्यांनी प्रवासातून परतल्यानंतर त्या विद्यार्थ्याच्या पत्राला उत्तर तर दिलंच, उत्तर देण्यात उशीर झाल्याने माफीही मागितली.

5/5

जेआरडी टाटांना कारपेंट्रीची आवड होती

जेआरडी टाटांना कारपेंट्रीची इतकी आवड होती की त्यांनी त्यांच्या घरात 250 स्वेअर फूटांच वर्कशॉप बनवून घेतला होता. (नोट : वरील माहिती आणि फोटो टाटा समुहाच्या ऑफिशिअल वेबसाइट टाटा डॉट कॉमवरुन घेतली आहे.)