प्रेग्नेन्सीच्या पहिल्या तिमाहीत करु नका 'या' चुका अन्यथा आई आणि बाळाला होईल त्रास

Avoid Mistakes in 1st Trimester: विशेषतः, गर्भधारणेचा पहिला तिमाही खूप नाजूक असतो. अशा परिस्थितीत महिलांनी गर्भधारणेच्या पहिल्या तिमाहीत काही चुका टाळायला हव्या. 

| Jan 18, 2024, 13:50 PM IST

Avoid Mistakes in 1st Trimester: गरोदरपणात महिलांनी जड वस्तू उचलू नये, असे अनेकदा सांगितले जाते. तसेच महिलांनी तणाव टाळला पाहिजे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

1/8

प्रेग्नेन्सीच्या पहिल्या तिमाहीत करु नका 'या' चुका, आई आणि बाळाला होईल त्रास

Avoid Mistakes in 1st Trimester of pregnancy mother and baby will suffer

Avoid Mistakes in 1st Trimester: गर्भधारणा हा एक अतिशय रोमांचक काळ असतो. या काळात नवरा आणि बायको दोघांसाठीही नवे आयुष्य सुरु झालेले असते.  जेव्हा एखादी स्त्री गर्भधारणा करते तेव्हा तो तिच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण असतो. 

2/8

मुलाबद्दल उत्सुकता

Avoid Mistakes in 1st Trimester of pregnancy mother and baby will suffer

गरोदरपणात महिलांना त्यांच्या होणाऱ्या मुलाबद्दल उत्सुकता असते. मात्र, या काळात महिलांना तणाव आणि आरोग्याच्या अनेक समस्यांनाही सामोरे जावे लागते. अशावेळी काय काळजी घ्यायची हे आपल्याला माहिती असायला हवे. 

3/8

पहिली तिमाही

Avoid Mistakes in 1st Trimester of pregnancy mother and baby will suffer

विशेषतः, गर्भधारणेचा पहिला तिमाही खूप नाजूक असतो. अशा परिस्थितीत महिलांनी गर्भधारणेच्या पहिल्या तिमाहीत काही चुका टाळायला हव्या. गरोदरपणात महिलांनी जड वस्तू उचलू नये, असे अनेकदा सांगितले जाते. तसेच महिलांनी तणाव टाळला पाहिजे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

4/8

गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत अवजड व्यायाम करणे टाळावे. हेवी व्यायाम केल्याने गुंतागुंत वाढू शकते. यामुळे गर्भपाताचा धोकाही वाढू शकतो. म्हणूनच, गर्भधारणेच्या पहिल्या तिमाहीत फक्त हलका व्यायाम करण्यास प्राधान्य द्या. अन्यथा तुमच्या समस्या वाढू शकतात.

5/8

जास्त वजन

Avoid Mistakes in 1st Trimester of pregnancy mother and baby will suffer

तुम्ही गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत जास्त वजन उचलणे टाळावे. जड वस्तू उचलल्याने गर्भपाताचा धोका वाढतो. जर तुम्ही देखील पहिल्या तिमाहीत असाल तर तुम्ही पुन्हा पुन्हा वाकू नका. घरी असताना पाण्याची बादली इत्यादी जड वस्तू उचलणे टाळा.

6/8

दारू आणि धूम्रपान

Avoid Mistakes in 1st Trimester of pregnancy mother and baby will suffer

गर्भधारणेदरम्यान महिलांनी मद्यपान आणि धूम्रपान करणे हे शरीरासाठी खूप हानिकारक आहे. तुम्ही गरोदरपणात मद्यपान करत असाल किंवा धूम्रपान करत असाल तर त्यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. गर्भधारणेच्या पहिल्या तिमाहीत दारू किंवा धूम्रपान करणे धोक्याचे ठरु शकते.

7/8

तणाव किंवा काळजी

Avoid Mistakes in 1st Trimester of pregnancy mother and baby will suffer

गर्भधारणेदरम्यान तणाव किंवा काळजी करू नका. या काळात तणावामुळे तुमच्या समस्या वाढू शकतात. गर्भधारणेदरम्यान हार्मोनल बदल होतात. यामुळे गरोदर महिलेला तणाव येऊ शकतो. पण तणाव आई आणि गर्भ दोघांच्याही आरोग्यास हानी पोहोचवू शकतो, हे लक्षात असू द्या.

8/8

पुरेशी झोप घ्या

Avoid Mistakes in 1st Trimester of pregnancy mother and baby will suffer

गरोदरपणात पूर्ण झोप घेणे आवश्यक आहे. झोपेची कमतरता किंवा निद्रानाश तुमचे आरोग्य बिघडू शकते. याशिवाय गर्भधारणेदरम्यान तुम्हाला थकवा जाणवू शकतो. त्यामुळे पूर्ण गरोदर महिलांनी झोप घेणे महत्वाचे आहे.