Ayodhya Ram Mandir: हनुमान, गणेश, जटायू, शबरी...; प्राणप्रतिष्ठेआधी PM मोदींनी जारी केली पोस्टाची तिकिटे

22 जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मंदिराचे लोकार्पण होत आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्याची संपूर्ण देशभरात चर्चा आहे. तर, अनेक भाविक हा सोहळा पाहण्यास उत्सुक आहेत. 

| Jan 18, 2024, 13:40 PM IST

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: 22 जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मंदिराचे लोकार्पण होत आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्याची संपूर्ण देशभरात चर्चा आहे. तर, अनेक भाविक हा सोहळा पाहण्यास उत्सुक आहेत. 

1/8

Ayodhya Ram Mandir: हनुमान, गणेश, जटायू, शबरी...; प्राणप्रतिष्ठेआधी PM मोदींनी जारी केली पोस्टाची तिकिटे

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha PM Modi Releases Postage Stamp include Ram Temple

प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री राम जन्मभूमी मंदिराचे स्मारक पोस्टाची तिकिटे जारी केली आहेत. तसंच, एक पुस्तक देखील जारी केले आहे. 

2/8

20 देशांची टपाल तिकिटे

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha PM Modi Releases Postage Stamp include Ram Temple

48 पानांच्या या पुस्तकात 20 देशांची टपाल तिकिटे आहेत. पंतप्रधान मोदी यांनी तूर्तास 6 टपाल तिकिटे जारी केली आहेत. 

3/8

6 टपाल तिकिटे

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha PM Modi Releases Postage Stamp include Ram Temple

पंतप्रधान मोदी यांनी जारी केलेल्या टपाल तिकिटावर राम मंदिर, भगवान गणेश, हनुमान, जटायू, केवटराज, शबरी यांची टपाल तिकिटे सामील आहेत.

4/8

पंतप्रधान मोदी

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha PM Modi Releases Postage Stamp include Ram Temple

टपाल तिकिटे जारी करताना, पंतप्रधान मोदींनी एक संदेशदेखील दिला आहे. मोदींनी म्हटलं आहे की, आज राम मंदिरला समर्पित 6 टपाल तिकिट जारी केले आहेत.

5/8

विविध देशात जारी

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha PM Modi Releases Postage Stamp include Ram Temple

जगातील विविध देशांमध्ये भगवान रामाशी संबंधित पोस्टल तिकिटे जारी करण्यात आली आहेत. त्याचा अल्बमही रिलीज झाला आहे. मी सर्व राम भक्तांचे अभिनंदन करतो.

6/8

टपाल तिकिटांवर चित्रण

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha PM Modi Releases Postage Stamp include Ram Temple

पंतप्रधान मोदींनी जारी केलेल्या टपाल तिकिटांवर राम मंदिर, चौपाई 'मंगल भवन अमंगल हारी', सूर्य, शरयू नदी आणि मंदिराच्या आसपासच्या मूर्तींचे चित्रण केले आहे.

7/8

प्राणप्रतिष्ठा सोहळा

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha PM Modi Releases Postage Stamp include Ram Temple

22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, संघप्रमुख मोहन भागवत आणि ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास गर्भगृहात उपस्थित राहणार आहेत

8/8

राम मंदिरात अभिषेक

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha PM Modi Releases Postage Stamp include Ram Temple

22 जानेवारीला रामनगरीच्या नव्याने बांधलेल्या मंदिरात रामललाच्या मूर्तीचा अभिषेक केला जाणार असून, 18 जानेवारी रोजी रामलल्ला गर्भगृहात प्रवेश करणार आहेत. यासोबतच  राम मंदिरात जलाधिवास-गंगाधिवास होणार आहे