दुधासोबत चुकूनही हे पदार्थ खाऊ नका अन्यथा...

जर तुम्ही दूधासोबत चिकन, मटण, गुळ यांसारखे पदार्थ खात असाल तर ते पदार्थ आरोग्यासाठी किती धोकादायक ठरु शकतात ते जाणून घ्या...   

Jan 18, 2024, 17:07 PM IST
1/7

लहानपणापासून अनेकजण दूध पिण्याचा सल्ला देतात. दूध आरोग्यासाठी फायदेशीर असतं हे देखील सांगतात. पण तुम्ही नुसतं दूधाचे सेवन करता की त्यासोबत आणखीन काही खाता हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.  

2/7

जर तुम्ही दूधासोबत चिकन, मटण, गुळ यांसारखे पदार्थ खात असाल तर ते पदार्थ आरोग्यासाठी किती धोकादायक ठरु शकतात ते जाणून घ्या...   

3/7

गुळ काही लोक हिवाळ्यात गूळाचा चहा पितात. काही लोक असे करणे फायदेशीर मानतात आणि दुधात साखरेऐवजी गूळ घालतात. पण आयुर्वेदात दूध आणि गूळ हे घातक मिश्रण मानले जाते. यामुळे पित्त आणि कफ दोष वाढतो जे हजारो रोगांचे कारण आहे. गुळाऐवजी खडीसाखर वापरा.  

4/7

आंबट फळे लिंबूवर्गीय फळे व्हिटॅमिन सी चा स्त्रोत आहेत. ते तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. पण ही फळे कस्टर्ड वगैरेमध्ये वापरू नयेत. डॉक्टरांच्या मते, योगरत्नाकर आयुर्वेदात या कॉम्बिनेशनचे वर्णन विष म्हणून केले आहे.

5/7

चिकन मटण  आयुर्वेदानुसार  हे सर्वात धोकादायक कॉम्बिनेशनपैकी एक आहे. त्यामुळे त्वचेचे आजार, अपचन आणि पोटाचे अनेक आजार होऊ शकतात. आयुर्वेद त्यांना गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिकल रोगांचे कारण मानतो.

6/7

 मीठ मीठचा वापर हा सर्वत पदार्थांमध्ये करावा लागतो. पण तुम्ही दुधासोबत याचे सेवन केल्यास हळूहळू पचनक्रिया बिघडते. त्यामुळे पचनशक्ती कमी होते. या मिठाऐवजी तुम्ही सैंधव मीठ वापरू शकता.

7/7

मुग डाळ प्रथिनांनी समृद्ध असलेली ही डाळ अतिशय आरोग्यदायी आहे. पायसम किंवा खीरमध्ये ती दुधात मिसळली जाते. पण हे मिश्रण पोटासाठी अजिबात चांगले नाही आणि त्यामुळे आजार होऊ शकतात