T20 World Cup 2024: क्रिकेट प्रेमींना जागरण अटळ? पाहा किती वाजता खेळवल्या जाणार USA मधील मॅचेस

टीम इंडियासाठी वर्ल्डकपचं मिशन लवकरच सुरु होणार आहे. यावेळी टीम इंडियाचा पहिला सामना आयरलँडविरूद्ध होणार आहे. 

| May 31, 2024, 13:55 PM IST
1/7

आयरलँडविरूद्धच्या सामन्यापूर्वी मॅचपूर्वी टीम इंडिया आणि बांगलादेशदरम्यान वॉर्मअप मॅच होणार आहे. 

2/7

टीम इंडियाचे लीग सामने अमेरिकेत होणार असून भारत आणि अमेरिकेच्या प्रमाणवेळेत जवळपास नऊ तास 30 मिनिटांचा फरक आहे. याशिवाय त्याचप्रमाणे वेस्ट इंडिज आणि भारताच्या प्रमाणवेळेतही फरक आहे. 

3/7

दोन्ही देशांमधील वेळेची तफावत पाहता वर्ल्डकप मॅचेस बघण्यासाठी चाहत्यांना रात्री जागून काढव्या लागणार का? असा प्रश्न उपस्थित होताना दिसतोय. 

4/7

वर्ल्डकपच्या खासकरून टीम इंडियाच्या या मॅचेस किती वाजता सुरू होणार आहेत आणि कोणत्या चॅनलवर लाईव्ह टेलिकास्ट होईल हे जाणून घेऊया.

5/7

टीम इंडियाच्या ग्रुप स्टेजमधील चारही मॅचेस अमेरिकेत होणार आहेत. भारतीय प्रमाणवेळेनुसार टीम इंडियाच्या चारही मॅचेस रात्री आठ वाजता असणार आहे. त्यामुळे या सामन्यांसाठी रात्री जागण्याची गरज नाही.

6/7

वर्ल्डकपमधील इतर मॅचेस सकाळी सहा, रात्री नऊ, पहाटे पाच, दुपारी 12 वाजून 30 मिनिटे, रात्री 10 आणि रात्री 10 वाजून 30 मिनिटांनी खेळवल्या जाणार आहेत. त्यामुळे या सामन्यासांठी तुमची झोपमोड होऊ शकते.  

7/7

याशिवाय भारतात टी-20 वर्ल्डकपचे भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील मॅचेसचं लाईव्ह टेलिकास्ट होणार आहे.