Ayodhya Ram mandir : तुम्हालाही अयोध्येसाठी निमंत्रण पत्रिका व अक्षता मिळाल्यात? मग त्या तांदळाचं काय करायचं?

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील नवीन राम मंदिरात रामलल्ला यांचं 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. यासाठी घरोघरी अक्षतासह पत्रिका देऊन निमंत्रण देण्यात येतं आहे. अशावेळी पत्रिकेसोबत मिळालेल्या अक्षता म्हणजे तांदळाचं काय करायचं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ काय म्हणतात जाणून घ्या. 

Jan 16, 2024, 12:43 PM IST
1/10

देशभरात रामभक्त गावाखेड्यात जाऊन घरोघरी अक्षता देवून अयोध्येला 22 जानेवारीसाठी निमंत्रण देत आहे. भारतासाठी हा एक ऐतिहासिक दिवस असून या दिवसाचे साक्षीदार होण्यासाठी हजारो लोक अयोध्येकडे वाटचाल करत आहेत. 

2/10

या भव्यदिव्य सोहळ्यासाठी घरोघरी रामभक्त अखंड तांदूळ म्हणजे अक्षता देत आहे. या तांदळाचं काय करायचं असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे. 

3/10

हिंदू धर्मात कोणत्याही शुभ सोहळ्यासाठी निमंत्रण देताना अक्षता देण्यात येते.  यासाठी हळद लावून तांदळाचं वाटप करण्यात येत. 

4/10

ज्योतिषशास्त्र पंडित सांगतात की, हे तांदूळ एका लाल रेशमी वस्त्रात बांधून ते तिजोरीत ठेवावं. यामुळे घरात धन, वैभव, लक्ष्मी आणि भौतिक सुखात वाढ होते. घरात आनंदाचं वातावरण राहतं. 

5/10

राम मंदिरातून मिळणाऱ्या तांदळाचं खूप महत्त्व असून रामलल्ला प्राणप्रतिष्ठापणेच्या दिवशी भाताची खीर बनवा. ही खीर बनवताना त्यात हे अक्षता टाका. यामुळे घरात समृद्धी नांदते. 

6/10

या अक्षताचा वापर कपाळाला टिळक करायला वापरा. शुभदिनी या अक्षताचा टिळक केल्यास तुम्हाला कामात यश मिळतं. 

7/10

नववधूने या अक्षता स्वयंपाकघरात जेवण करताना वापरा. यामुळे घरात सौहार्द कायम राहतं. 

8/10

त्या अक्षता पूजेत वापरा किंवा कन्यादानाचं भाग्य असेल तर ते कन्यादानाच्या वेळी वापरा. 

9/10

स्वयंपाकघरातील तांदळाच्या डब्यात ठेवा. त्यामुळे घरात कधीही धनधान्यची कमतरता जाणवत नाही. 

10/10

22 जानेवारीला त्या अक्षताची पूजा करुन जवळच्या मंदिरात जाऊन त्या अर्पण करायच्या. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)