अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीत खाऊताईचा वाटा उचलण्याची संधी; कशी जाणून घ्या येथे

Ayodhya Ram Mandir : येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील भव्य आणि दिव्य श्रीराम मंदिरात रामलला विराजमान होणार आहेत. देशात उत्साहाचे वातावरण आहे. 

| Jan 11, 2024, 12:10 PM IST

Ram Mandir Inauguration : सध्या भारतातच नाही तर जगभरात अयोध्यातील राम मंदिराची चर्चा सुरु झाली आहे. येत्या 22  जानेवारीला या मंदिराची प्राणप्रतिष्ठा पार पडणार आहे. या भव्य मंदिराच्या उभारणीत आपलाही खारीचा वाटा असावा असं जगभरातील कित्येक रामभक्तांना वाटत आहे. यासाठी कित्येक जण ऑनलाईन देणगी देण्याचा मार्ग निवडत आहे. जर तुम्हालाही राम मंदिरासाठी देणगी देयाची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 

1/9

जेव्हापासून राम मंदिराचे निर्माणकार्य सुरु झाले आहे, तेव्हापासून राम भक्त मोठया उदार मनाने मंदिरासाठी दान देत आहेत. नुकतेच राम मंदिर ट्रस्टने निधी समर्पण मोहीम सुरू केली असून यामध्ये राम मंदिराच्या विकासासाठी आतापर्यंत 5000 कोटींहून अधिक रक्कम देणगी म्हणून मिळाली आहे.

2/9

मंदिराच्या बांधकामावर खर्च केल्यानंतर ट्रस्टच्या बँक खात्यांमध्ये 3500 कोटींहून अधिक रोख रक्कम जमा झाली आहे. जर तुम्हालाही रामलला मंदिरात दान करायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. तुम्ही राम मंदिरात कशा पद्धतीने दान करु शकतात ते पाहा... 

3/9

राममंदिराच्या विकासासाठी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट नावाचा ट्रस्ट स्थापन करण्यात आला आहे. प्रत्येकजण या ट्रस्टला देणगी देत आहे. राम भक्त वेगवेगळ्या प्रकारे दान करू शकतात. जसे की रोख रक्कम देऊन, ट्रस्टच्या खात्यावर पाठवून किंवा ऑनलाइनच्या माध्यमातून तुम्ही देणगी देऊ शकता.   

4/9

जर तुम्ही रोख रक्कम देत असाल तर तुम्हाला लगेच पावती दिली जाईल. याशिवाय जर तुम्ही ऑनलाईन पेमेंटच्या मदतीने देणगी देत असाल तर तुम्हाला तुमच्या ई-मेल आयडीवर जनरेट केलेली पावती मिळेल. तसेच बँक खात्यात हस्तांतरण करणारे लोक अधिकृत वेबसाईटवर पावती घेऊ शकता.   

5/9

बँक खात्याची सर्व माहिती श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या वेबसाइटवर दिली आहे. ट्रस्टशी संबंधित सर्व बँक खात्यांची यादी वेबसाइटवर अपलोड करण्यात आली आहे. तुम्ही बँक खात्याचे तपशील पाहून पैसे जमा करू शकता. ट्रस्टने तीन बँक खात्यांचा तपशील जाहीर केला आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा किंवा बँकेट अशी फक्त तीन खाती आहेत.  

6/9

A/c Name :Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra(SBI) A/C No. :39161495808 IFSC Code: SBIN0002510 Branch :Naya Ghat, Ayodhya, UP

7/9

A/c Name :Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra (BOB) A/C No. : 05820100021211 IFSC Code :BARBOAYODHY Branch :Naya Ghat, Ayodhya, UP  

8/9

A/c Name :Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra (PNB) A/C No. :3865-000-1001-39999 IFSC Code :PUNB0386500 Branch :Naya Ghat, Ayodhya U.P.

9/9

बँक आणि शाखेचे नाव :- भारतीय स्टेट बँक, शाखा:- 11 संसद मार्ग नवी दिल्ली खाते क्रमांक :- 42162875158 IFSC Code: – SBIN0000691 खातेधारकाचे नाव :- श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र