PHOTO : लग्नाच्या वेळी 'या' अभिनेत्याचा बँक अकाऊंटमध्ये होते फक्त 10 हजार रुपये! पैशासाठी ट्रेनमध्ये गायले गाणे; आज 80 कोटींचा मालक

Entertainment : या अभिनेत्याने केवळ आपल्या गायनाने नव्हे तर आपल्या अभिनयाने लोकांची मनं जिंकली आहेत. एकेकाळी पैशांसाठी तो ट्रेनमध्ये गाणी गायचा. लग्न केलं तेव्हा बँक अकाऊंटमध्ये होते फक्त 10 हजार रुपये. पण त्याने हार मानली नाही. आज मुंबईत सगळ्या बेस्ट ठिकाणी त्याच आलिशान घर आहे. त्याचा बाल्कनीतून मुंबईतील विहंगम दृश्य दिसतं. 

Sep 14, 2024, 11:50 AM IST
1/7

आपल्या टॅलेंटच्या जोरावर बॉलिवूडमध्ये विशेष ठसा उमटवणारा अभिनेता आहे आयुष्मान खुराना. आज 14 सप्टेंबरला त्याचा 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. तो जितका चांगला अभिनेता आहे तितकाच तो एक चांगला जीवनसाथीही आहे.

2/7

अभिनेत्री यामी गौतमसोबत विकी डोनर या चित्रपटातून डेब्यू करणारा हा अभिनेत्याला चाहत्यांनी खूप पसंत केलं. व्यावसायिक आयुष्यापेक्षा त्याचं वैयक्तिक आयुष्य खूपच फिल्मी आहे. बालपणीची मैत्रिण ताहिरा कश्यपसोबत त्याने जेव्हा लग्न केलं तेव्हा तो आर्थिक संकटात होता. 

3/7

तो 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेदरम्यान आयुष्यमान ताहिराला भेटला होता. त्याचे पहिल्या प्रेमात त्याला अनेक चढउतार पाहावे लागले. जेव्हा त्याने रोडीज जिंकला आणि रिॲलिटी टीव्ही शो होस्ट केला तेव्हा त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. त्यामुळेच त्याने त्याच्या गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप केले. पण 6 महिन्यांनंतर त्याला वाटले की तो ताहिराशिवाय जगू शकत नाही आणि तो तिच्याकडे परतला.

4/7

त्याला लहानपणापासून गाण्याची आवड होती. महाविद्यालयीन जीवनात अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला. त्यावेळी पैसे कमी असताना ट्रेनने जाताना गाणी म्हणायचो, त्यासाठी लोकांकडून पैसेही मिळायचे, असं अभिनेत्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं. आज त्याच मुंबईत आलिशान घर आहे. तर तो 80 कोटी संपत्तीचा मालक आहे. 

5/7

अभिनेत्याचे आलिशान अपार्टमेंट लोखंडवाला, अंधेरी पश्चिम, मुंबई येथे 'विंडसर ग्रांडे रेसिडेन्सेस'च्या 20 व्या मजल्यावर आहे. 4,000 चौरस फुटांचे घर 7 बेडरूमच्या फ्लॅटमध्ये गृह सजावट सल्लागार तनिषा भाटिया यांनी सजवलंय. 

6/7

आयुष्मान खुरानाच्या लिव्हिंग रूममध्ये 4 आलिशान बसण्याची जागा, एक छोटा बार आणि जेवणाचे टेबल आहे. त्याचा हॉल लांबच नाही तर खूप मोठा आहे. काचेच्या खिडक्यांमुळे राहत्या भागात नैसर्गिक प्रकाश येतो. एका कोपऱ्यात आरामखुर्ची आहे तर दुसऱ्या कोपऱ्यात जेवणाचे टेबल आहे. नारिंगी फुलांच्या खुर्चीशिवाय बेज रंगाचा सोफा सेटही आहे.

7/7

आयुष्मान खुरानाने त्याच्या दमदार अभिनयासाठी आणि उत्कृष्ट गायनासाठी अनेक पुरस्कार जिंकले आहेत. तिच्या घराचा एक कोपरा खास त्यांच्यासाठी सजवला आहे. हिरव्या रंगाच्या अभिजात रंगात हा परिसर अतिशय सुंदर दिसतो.