दाऊदसोबत पंगा, शाहरुख - सलमानसोबत खास मैत्री अन्... बाबा सिद्दीकी कोण आहेत?

baba siddique iftar party 2023 : दरवर्षीप्रमाणे यंदाही बाबा सिद्दिकी यांनी जवळच्या लोकांसाठी मुंबईत इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत बॉलिवुडमधील अनेक बड्या कलाकारांनी हजेरी लावली होती. या पार्टीत शाहरुख खान, सलमान खान, कतरिना कैफ आणि सुनील शेट्टी सारखे अनेक स्टार्स उपस्थितीत होते.

Apr 17, 2023, 19:56 PM IST
1/7

baba siddique iftar party 2023

दरवर्षी बाबा सिद्दिकीच्या इफ्तार पार्टीत आमंत्रण मिळताच अनेक कलाकार त्या पार्टीत सामील होतात. पण बाबा सिद्दीकी हे व्यक्तिमत्त्व नेमकं आहे तरी कोण? चला तर मग जाणून घेऊयात थोडक्यात... (सर्व फोटो - babasiddiqueofficial)  

2/7

3/7

baba siddique

बाबा सिद्दिकी काँग्रेस पक्षातील असून त्यांनी मुंबईतील वांद्रे पश्चिम मतदार संघातून सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. 2017 मध्ये सक्तवसुली संचालनायाने मनी लॉड्रिंग प्रकरणात बाबा सिद्दिकी यांच्यासह इतर पाच ठिकाणी छापे टाकले होते.

4/7

baba siddique dawood ibrahim

मुंबईतील एका जमिनीवरून बाबा सिद्दिकी आणि डॉन दाऊद इब्राहिमच्या जवळची व्यक्ती अहमद लंगडा यांच्यात वाद झाला होता. या वादात दोघांमध्ये खटके उडाले होते परिणामी दाऊदने बाबा सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.

5/7

Threat to Baba Siddiqui

दाऊदने धमकी देताना सांगितले होते की राम गोपाल वर्माला सांगून तुझ्यावर एक चित्रपट तयार केला जाईल त्याचं नाव असेल 'एक था एमएलए'. 

6/7

congress ex mla baba siddique

या धमकीवरुन बाबा सिद्दीकी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी बाबा सिद्दिकी यांचे संरक्षण वाढवले होते.  

7/7

baba siddique party

बाबा सिद्दीकी सलमान खान आणि शाहरुख खान यांसारख्या सेलिब्रिटींसोबतच्या मैत्रीमुळेही कायमच चर्चेत असतात