Green Tea Benefits : तुम्हीपण यावेळी पिता ग्रीन टी? आजच बदला 'ही' सवय, नाहीतर...

Green Tea Benefits and when to drink : ग्रीन टी (Green Tea) प्यायल्यानं अनेक फायदे होतात हे आपण नेहमी जाहिरातींमध्ये ऐकत असतो. वजन कमी करायचं असेल तर ग्रीन टी पिण्याचा सल्ला तर आपल्याला सहजपणे कोणीही करतो. पण ग्रीन टी प्यायल्यानं कोणत्याही प्रकारचं नुकसान नाही हा विचार करण चुकीची गोष्ट आहे. कारण ग्रीन टी पिण्याची देखील एक योग्य वेळ असते. जर आपण तेव्हा ग्रीन टी न पिता कधीही प्यायलो तर त्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो. 

| Apr 17, 2023, 18:26 PM IST
1/7

Green Tea Side Effects

 वजन कमी - ग्रीन टीमध्ये असलेले अॅन्टीऑक्सीडंट्स, मेटाबॉलिज्म वाढवतात. त्यामुळे वजन हळू-हळू कमी होऊ लागते. वर्कआऊट करण्याआधी तुम्ही ग्रीन टी प्यायल्यानं नक्कीच फायदा होईल.

2/7

Green Tea Side Effects

कोलेस्ट्रॉल कमी होईल - नेहमी ग्रीन टी प्यायल्यानं कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. त्यासोबत हृदयासंबंधीत आजार होण्याची शक्यता कमी होते. 

3/7

Green Tea Side Effects

स्किन इन्फेक्शनपासून सुटका - आपली त्वचा डॅमेज होत असेल तर ग्रीन टी पिणं फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे त्वचेच्या संसर्गापासून संरक्षण मिळते. फक्त इतकंच नाही तर टोन्ड बॉडी आणि पिंपल्सची समस्या दूर होते.  

4/7

Green Tea Side Effects

कर्करोगापासून सुटका ( Prevent Cancer) - ग्रीन टीचे सेवन केल्यास कर्करोगापासून सुटका मिळू शकते. कारण ग्रीन टीमध्ये असलेले पॉलीफिनॉल्स, ट्यूमर आणि कॅन्सर सेल्स वाढत नाहीत. 

5/7

Green Tea Side Effects

ग्रीन टी कधी प्यायला हवी? - खाण्याच्या एक तास आधी ग्रीन टी पिणे फायदेशीर मानले जाते. ग्रीन टी जेवल्यानंतर पिऊ नका. त्यामुळे मळमळ, बद्धकोष्ठता आणि पोटदुखीच्या तक्रारी सुरु होऊ शकतात. रिकाम्या पोटी पिऊ नका. 

6/7

Green Tea Side Effects

दिवसभरातून किती कप प्यायला हवे - दिवसभरातून ग्रीन टीचे फक्त 3 कप प्याल. त्यापेक्षा जास्त प्यायल्यानं तुम्हाला त्रास होईल. तर झोपण्यापूर्वी जर तुम्ही ग्रीन टी प्याल तर त्यानं डिहायड्रेशन होण्याची शक्यता वाढते. 

7/7

Green Tea Side Effects

लक्ष केंद्रीत करण्यासाठी फायदे कारक - ग्रीन टीचे रोज सेवन केल्यास तुम्हाला कॅफीन मिळते, त्यानं तुमचं लक्ष केंद्रीत होण्यास मदत होते असं म्हणतात. (All Photo Credit : File Photo )(Disclaimer : दिलेली माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)