डॉ. आंबेडकरांनी अभ्यासासाठी वापरलेली खुर्ची आणि चष्मा.. बाबासाहेबांचे अतिशय दुर्मिळ फोटो
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 14 एप्रिल रोजी 134 वी जयंती साजरी करत आहोत. बाबासाहेबांचं कार्य आणि त्यामागील मेहनत प्रत्येकाला कळावी या उद्देशाने त्यांचे काही दुर्मिळ फोटो.
14 एप्रिल रोजी डॉ. भिमराव आंबेडकर यांची 134 जंयती आपण साजरी करत आहोत. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही 'आंबेडकर जयंती' किंवा 'भिम जयंती' म्हणूनही ओळखली जाते. 1891 साली जन्मलेले डॉ. आंबेडकर हे केवळ भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार नव्हते तर स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री, एक न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी आपले जीवन अस्पृश्यांवरील भेदभाव नष्ट करण्यासाठी आणि महिला आणि कामगारांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी समर्पित केले. त्यामुळे त्यांची जयंती 'समता दिन' म्हणूनही ओळखली जाते. अशा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे दुर्मिळ फोटो आपण पाहणार आहोत. यातील फोटो हो 'माझी आत्मकथा' या पुस्तकातील आहेत.