बदलापूर प्रकरण: गौतमी पाटीलचा सर्व मुलींना 3 शब्दांचा सल्ला! पालकांना म्हणाली, 'आई-वडिलांनी...'

Gautami Patil Advice To Parents After Badlapur School Sexual Assault Case: आपल्या डान्समुळे महाराष्ट्रभर चर्चेत असलेली नृत्यांगणा गौतमी पाटीलने राज्यामधील वेगवेगळ्या भागांमधून समोर येत असलेल्या महिलांविरुद्धच्या आत्याचारांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर लहान मुलींच्या पालकांना आणि तरुणींना एक सल्ला दिला आहे. ती नेमकं काय म्हणालीय पाहूयात...

| Aug 28, 2024, 10:29 AM IST
1/8

gautamipatiladvice

नृत्यांगणा गौतमी पाटीलने पालकांबरोबरच सर्व मुलींना एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. तिने महाराष्ट्रातील परिस्थितीसंदर्भात भाष्य करताना काय म्हटलंय पाहूयात...

2/8

बदलापूरमधील शाळेमध्ये दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर जनक्षोभ उसळून आला. बदलापूरमधील त्या शाळेत नेमकं काय घडलं याचा सध्या तपास सुरु आहे. मात्र या प्रकरणावरुन उफाळून आलेल्या जनक्षोभानंतर त्या दिवशी अनेक तास रेल्वेची वाहतूक आडवून धरल्यानंतर बदलापूरमध्ये पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. या साऱ्या प्रकरणावरुन राजकारण सुरु असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. 

3/8

gautamipatiladvice

मागील काही दिवसांपासून राज्याच्या वेगवेगळ्या भागांमधून लैंगिक अत्याचाराच्या बातम्या समोर येत असतानाच प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिने राज्यातील या वाढत्या गुन्हेगारीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.  

4/8

gautamipatiladvice

'मागील आठवड्याभरापासून हे जे चाललं आहे ते पाहून काय बोलू हे कळत नाही', अशी प्रतिक्रिया गौतमी पाटीलने नोंदवली आहे. गौतमी दहीहंडीनिमित्त मुंबईत आली होती. त्याचवेळी तिने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 

5/8

gautamipatiladvice

"पोरींनो सुरक्षित राहा! असं मी सर्व मुलींना सांगू इच्छिते. अगदी लहान मुलींपासून ते मोठ्या मुलींपर्यंत सर्वांना माझं हेच सांगणं आहे की पोरींनो सेफ राहा," असं गौतमी पाटीलने राज्यातील वाढत्या अत्याचारांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर म्हटलं आहे.

6/8

gautamipatiladvice

गौतमी पाटीलने लहान मुलींच्या पालकांनाही एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. मागील काही दिवसांपासून राज्याच्या वेगवेगळ्या भागांमधून अल्पवयीन मुलींवर तसेच महिलांवर लैंगिक अत्याचार होत असल्याच्या बातम्या समोर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर गौतमीने हा सल्ला दिला आहे.  

7/8

gautamipatiladvice

लहान मुलींच्या आई-वडिलांनी विचार करावा की आपल्या पोरीला कसं जपावं, असं गौतमी पाटीलने म्हटलं आहे.   

8/8

gautamipatiladvice

दहीहंडीच्या दिवशी गौतमीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं 'दिघे साहेबांची दहीहंडी' म्हणत टेंभी नाक्यावर आयोजित केलेल्या सोहळ्याबरोबरच अन्य काही ठिकाणी हजेरी लावून डान्सच्या माध्यमातून चाहत्यांचं मनोरंजन केलं. त्यानंतरच तिने राज्यातील मुलींच्या परिस्थितीबद्दल प्रतिक्रिया नोंदवली.