Bageshwar Dham Net Worth: करोडो समर्थक असणाऱ्या बागेश्वर बाबांकडे किती संपत्ती? आकडा जाणून हैराण व्हाल

बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती फार चांगली नव्हती. एक वेळ अशी होती जेव्हा त्यांना दोन वेळचं जेवणही नीट मिळत नव्हतं.   

Jul 04, 2023, 16:47 PM IST
1/10

Bageshwar Baba Net Worth

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा जन्म 4 जुलै 1996 रोजी मध्य प्रदेशातील छतरपूर येथील गडागंज ग्राम येथे झाला.   

2/10

Bageshwar Baba Net Worth

त्यांचं कुटुंब गडागंज येथे राहत होतं. येथेच प्राचीन बागेश्वर धाम मंदिर आहे.   

3/10

Bageshwar Baba Net Worth

बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती फार चांगली नव्हती. एक वेळ अशी होती जेव्हा त्यांना दोन वेळचं जेवणही नीट मिळत नव्हतं.   

4/10

Bageshwar Baba Net Worth

त्यांचं कुटुंब कच्च्या घरात राहत होतं. पावसाळ्यात या घरात नेहमी पाणी झिरपत असायचं.   

5/10

Bageshwar Baba Net Worth

आपण लोकांच्या मनातील गोष्टी समजू शकतो असा बागेश्वर बाबांचा दावा आहे. जेव्हा एखादा भक्त आपली समस्या घेऊन त्यांच्याकडे येतो तेव्हा ते आधीच कागदावर त्याची समस्या आणि त्यावरील उपाय लिहून देतात.   

6/10

Bageshwar Baba Net Worth

सनातन धर्माची शतकानुशतके जुनी परंपरा असलेल्या ध्यान पद्धतीचा हा परिणाम असल्याचं बागेश्वर बाबा सांगतात. आभासी शक्तीच्या माध्यमातून भक्ताची समस्या जाणून ते कागदावर लिहितात असा दावा आहे.   

7/10

Bageshwar Baba Net Worth

बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री यांना त्यांच्या मालमत्तेबद्दल अनेकदा विचारण्यात आलं आहे. कमाई किती आहे? याला उत्तर देताना बागेश्वर धामचे प्रमुख म्हणाले, 'आमच्याकडे कोणतेही निश्चित उत्पन्न नाही, कारण आमची कोणतीही कंपनी किंवा व्यवसाय नाही. आपल्याकडे करोडो सनातनींचे प्रेम आहे, लाखो कोटी लोकांचे आशीर्वाद आहेत आणि असंख्य संतांचे आशीर्वाद आहेत, एवढेच आपण कमावतो".  

8/10

Bageshwar Baba Net Worth

बागेश्वर बाबा म्हणाले, 'आम्ही भक्तांकडून दक्षिणा घेतो, ती घेणे वाईट नाही. तिचा योग्य वापर करतो किंवा दुरुपयोग यावर ती चांगली की वाईट हे ठरतं. कोणी काही दिले तर आपण गुरू म्हणून स्वीकारतो. आपण त्या परंपरेचे आहोत जिथे गुरूला अंगठाही दान केला जातो. अशा परिस्थितीत जर कोणी स्वत:ला माझा शिष्य, मी त्याचा गुरू मानत असेल, तर गुरुशिष्य परंपरा म्हणून त्याने आपल्याला काहीही द्यावे".   

9/10

Bageshwar Baba Net Worth

प्राप्त माहितीनुसार, बागेश्वर बाबा यांची मासिक कमाई 3.5 लाख रुपयांपर्यंत आहे. ते रोज सुमारे आठ हजार रुपये कमावतात.   

10/10

Bageshwar Baba Net Worth

बागेश्वर बाबा यांच्यावर अंधश्रद्धेला प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे. त्याच्यावर नागपुरात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नागपूरच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हा गुन्हा दाखल केला होता.