Bail Pola Wishes in Marathi : बैलपोळा सणानिमित्त सर्व कृषिबांधवांना हार्दिक शुभेच्छा, अशी व्यक्त करा कृतज्ञता

Happy Bail Pola Wishes in Marathi: बैलपोळा सणानिमित्त सर्व कृषिबांधवांना हार्दिक शुभेच्छा 

| Sep 01, 2024, 18:53 PM IST

Bail Pola 2024 : भारत हा कृषीप्रधान देश आहे. या देशात बैलांना अतिशय महत्त्व आहे. बैलपोळा हा दिवस महाराष्ट्रात अतिशय उत्साहात, आनंदात साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक शेतकरी आपल्या आवडीने आणि ऐपतीने बैलाला सजवतो, त्याला साजश्रृंगार करतात. हा दिवस आपल्या जवळच्या सर्व व्यक्तींसोबत साजरा करा. 

1/10

कष्टाशिवाय मातीला...  बैलाशिवाय शेतीला...  अन् बळीराजाशिवाय...  देशाच्या प्रगतीला पर्याय नाही...  बैलपोळा सणाच्या शुभेच्छा 

2/10

तुझ्या अपार कष्टाने  बहरते सारी भुई  एका दिवसाच्या पूजेने  बोई कसा उतराई  सर्व शेतकरी बांधवांना  बैलपोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा 

3/10

सण आला आनंदाचा, माझ्या सर्जा राजाचा, ऋणं त्याचे माझ्या माथी, सण गावच्या मातीचा, बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा !

4/10

आला आला रे बैल पोळा गाव झालं सारं गोळा, सर्जा राजाला घेऊनी सारे जाऊया राऊळा, बैलपोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा.!!

5/10

जसे दिव्याविना वातीला, आणि वातीविना दिव्याला नाही पर्याय, तसेच कष्टाविना मातीला आणि बैलाविना नाही शेतीला पर्याय, बैलपोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा

6/10

नको लावू फास बळीराजा आपुल्या गळा, दे वचन आम्हास आज दिनी बैल पोळा, बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

7/10

शेतात राबणाऱ्या तुझ्या अंगाला, आज शांत निजू दे.. तुझ्या घामानं फुलणाऱ्या पिकाला, तुझ्या डोळ्यात सजू दे.. बैलपोळ्याच्या शुभेच्छा..!

8/10

आज पुंज रे बैलाले, फेडा उपकाराचं देनं.. बैला, खरा तुझा सन, शेतकऱ्या तुझं रीन.. बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..

9/10

सर्व शेतकरी बांधवांना बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा..

10/10

सण आला आनंदाचा, माझ्या सर्जा राजाचा, ऋणं त्याचे माझ्या माथी, सण गावच्या मातीचा, बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा