धक्कादायक! केकेआरच्या 'या' खेळाडूच्या घराची जाळफोड, कॅप्टनची गाडी फोडली

Mashrafe Mortazas House Set on Fire : गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये लोकांच्या मनातील अस्वस्थेचा उद्रेक पहायला मिळतोय. अशातच आता शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे.

| Aug 05, 2024, 21:35 PM IST
1/5

बांगलादेश

शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला अन् देश सोडला. त्यानंतर आता बांगलादेशात जाळफोडीची प्रकरणं समोर येत आहेत.

2/5

मश्रफे मोर्तझा

बांग्लादेशमधल्या उद्रेकाचा फटका माजी कॅप्टन मश्रफे मोर्तझालाही बसलाय. आंदोलकांनी क्रिकेटर मश्रफे मोर्तझाचं घर जाळलंय. तसेच मालमत्तेचं नुकसान देखील केलंय.

3/5

बांग्लादेशचं नेतृत्त्व

टेस्ट, वनडे आणि ट्वेण्टी-20 अशा तीनही फॉरमॅटमध्ये मोर्तझाने बांग्लादेशचं नेतृत्त्व केलंय. बांग्लादेश क्रिकेट संघाचा तो सर्वात यशस्वी कॅप्टन म्हणून ओळखला जातो. 

4/5

नराईल एक्स्प्रेस

आयपीएलमध्ये तो शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला होता. नराईल एक्स्प्रेस म्हणून प्रसिद्ध असलेला मोर्तझा सध्या राजकारणातसुद्धा आहे.

5/5

खासदार

दरम्यान, नरेल-2 या जिल्ह्याचा तो सध्या विद्यमान खासदार आहे. बांग्लादेशमधल्या उद्रेकाचा फटका मश्रफे मोर्तझाला देखील बसला.