गणेशोत्सव २०१९ : सेलेब्रिटींच्या घरी बाप्पांचे आगमन

अनेक दिवसांपासून भक्तांना चाहूल होती ती म्हणजे बाप्पांच्या आगमनाची.

Sep 02, 2019, 09:52 AM IST

मुंबई : अनेक दिवसांपासून भक्तांना चाहूल होती ती म्हणजे बाप्पांच्या आगमनाची. अखेर २ ऑगस्टला बाप्पा घराघरात विराजमान झाले आहेत. या १० दिवसांमध्ये गणेश मंडळांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण असते. सिनसृष्टीच्या चंदेरी दुनियेत सुद्धा बाप्पांचे मोठ्या थाटात आगमन होत आहे. काही सिताऱ्यांचे गणपती घरी घेऊन जाण्याचे फोटो कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. त्यातील काही निवडक फोटो.

1/5

गणपती बाप्पा मोरया...

गणपती बाप्पा मोरया...

दरवर्षी प्रमाणे यंदा देखील अभिनेत्री शिल्पा शेट्टी, अभिनेता सोनू सूद, स्वप्निल जोशी, विवेक ओबेरॉय यांच्या घरी देखील बाप्पा विराजमान झाले आहेत. 

2/5

शिल्पा शेट्टी

शिल्पा शेट्टी

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी दर वर्षी मोठ्या थाटात गणपती घरी आणते. त्यानंतर मनोभावे गणपतीची पूजा करते. 

3/5

विवेक ओबेरॉय

विवेक ओबेरॉय

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयच्या घरात देखील बाप्पांची स्थापना होते. 

4/5

स्वप्निल जोशी

स्वप्निल जोशी

मराठी कलाविश्वात चॉकलेट बॉय म्हणून ओळख असलेल्या स्वप्निल जोशीच्या घरी देखील बाप्पांचे आगमन झाले आहे. त्याच्या कुटुंबासोबत फोटो सध्या व्हायरल होत आहेत. 

5/5

सोनू सूद

सोनू सूद

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सोनू सूदच्या घरी देखील बाप्पांचे स्वागत मोठ्या धूमधडाक्यात झाले.