Team India: 'या' तारखेला होणार World Cup टीमची घोषणा! अजित आगरकर म्हणतात...

Ajit Agarkar On World Cup Team Announcement : वर्ल्ड कपसाठीच्या टीम इंडियाची घोषणा कधी होणार? याचं उत्तर चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांनी दिलं आहे.

Aug 22, 2023, 13:54 PM IST

ICC World Cup 2023 Team India Squad: येत्या 5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड कपसाठी  इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, टीम इंडियाची अद्याप घोषणा झाली नाही. त्यामुळे आता टीम इंडियाची घोषणा नेमकी कधी केली जाईल, याची तारीख चीफ सिलेक्टर अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी सांगितली आहे.

1/5

वर्ल्ड कप टीम

वर्ल्ड कपसाठी 5 सप्टेंबरला वर्ल्ड कप टीम जाहीर केली जाईल, असं अजित आगरकर यांनी म्हटलं. त्यावेळी त्यांनी स्पष्टीकरण देखील दिलं.

2/5

शेवटच्या दिवशी पत्ते उघडणार

आयसीसीने सर्व एकूण 10 संघांना 5 सप्टेंबरपर्यंत आपल्या 15 सदस्यीय संघाची नाव पाठवायला सांगितली आहेत. त्यामुळे अखेरच्या दिवशी टीम इंडिया आपले पत्ते उघडणार आहे.

3/5

5 सप्टेंबर

आयसीसीच्या नियमांनुसार बीसीसीआय शेवटच्याच दिवशी म्हणजेच 5 सप्टेंबरलाच भारतीय संघ जाहीर करेल, असं आगरकर यांनी सांगितलं आहे.

4/5

लिटमस टेस्ट

आशिया कप म्हणजे आगामी वर्ल्ड कपची लिटमस टेस्ट. त्यामुळे आशिया कपमधील खेळाडू वर्ल्ड कप खेळतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

5/5

आशिया कपसाठी टीम इंडिया

आशिया कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा,  केएल राहुल,  ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.