अभिनयासोबतच बॉलिवूडमधील 'या' जोडप्यांच्या आहेत स्वत:च्या कंपनी

Bollywood Celebrities: अभिनयासोबतच बॉलिवूडच्या लोकप्रिय कलाकारांच्या जोड्यांनी स्वत:चे प्रॉडक्शन हाऊस सुरु केले आहेत. बॉलिवूडमधील बरेच कलाकार यांनी अभिनयासोबतच 'निर्मिती क्षेत्रात'ही मोठं यश कमवलं.     

Jul 04, 2024, 17:00 PM IST
1/7

'एकता कपूर'पासून ते 'करण जोहर'पर्यंत अनेक कालाकारांना बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी मिळाली. मात्र याच सोबत असे अशा काही कलाकारांच्या जोड्या आहेत, ज्यांनी स्वत:चं प्रॉडक्शन हाऊस सुरु केलं असून अनेक सुपरहिट सिनेमांची निर्मिती केली.   

2/7

बॉलिवूडचा 'किंग खान' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता 'शाहरुख खान' आणि त्याची 'पत्नी गौरी खान' यांनी 2002 मध्ये 'Red Chillies 'या प्रॉडक्शन हाऊसला सुरुवात केली. 

3/7

 शाहरुखची पत्नी गौरी घर सांभाळण्यासोबत त्यांची कंपनी देखील सांभाळते. 

4/7

अभिनेत्री 'सरगुन मेहता' आणि तिचा पती 'रवि दुबे' यांनी अभिनयाव्यतिरिक्त निर्मीती क्षेत्रातही मोठं यश कमवलेलं आहे. यांच्या प्रॉडक्शन हाऊसने कलर्सवरील 'उडारियां' या मालिकेची आणि 'जट नू चुड़ैल तकरी' या सिनेमाची निर्मिती केली. 

5/7

'जवान' सिनेमाचा दिग्दर्शक 'एटले' आणि त्याची पत्नी 'प्रिया' याचं स्वत:चं प्रॉडक्शन हाऊस आहे. या दोघांनी एकत्र येत बऱ्याच सिनेमांची निर्मिती केली.   

6/7

'सूर्या' आणि 'ज्योतिका' या जोडीचा सोशलमीडियावर फॅन फॉलोविंग मोठ्या प्रमाणात आहे. अभिनयाव्यतिरिक्त यांनी 'जय भिम' आणि' पासंगा 2' या सिनेमांची निर्मिती केली.    

7/7

'हिरामंडी'मधून अभिनयाची छाप सोडणारी 'रिचा चड्डा' आणि तिचा पती 'अली फैज़ल' यांचं स्वत:चं प्रॉडक्शन हाऊस आहे. अली फैज़ल ने 'फुकरे' आणि 'मिर्जापुर'मधून लोकांच्या पसंतीस उतरला होता.