Bday Special : सलमान खानच्या आयुष्यातील 8 रोमांचक गोष्टी

सलमान खानचं संपूर्ण आयुष्यच वादांनी भरलेलं आहे. पण त्याच्या आयुष्यातील खूप पैलू आणि खूप गोष्टी प्रेक्षकांना माहित नाहीत. ते आज जाणून घेणार आहोत. 

| Dec 27, 2018, 11:03 AM IST

सलमान खानचं संपूर्ण आयुष्यच वादांनी भरलेलं आहे. पण त्याच्या आयुष्यातील खूप पैलू आणि खूप गोष्टी प्रेक्षकांना माहित नाहीत. ते आज जाणून घेणार आहोत. 

1/9

सलमान खानला आज आपण वेगवेगळ्या नावाने ओळखतो. कुणी त्याला सल्लू, दबंग म्हणतं तर कुणी त्याला भाईजान म्हणतं. पण सलमान खानचं खरं नाव आहे अब्दुल राशिद सलीम सलमान खान आहे. 

2/9

सलमान खानने आपल्या करिअरची सुरूवात 1988 मध्ये 'बीवी हो तो ऐसी' या सिनेमातील सहकलाकार म्हणून केली. या सिनेमात सलमान खान दिसला पण त्याचा आवाज मात्र नव्हता. या सिनेमात दुसऱ्या कलाकाराचा आवाज वापरण्यात आला होता. 

3/9

1989 मध्ये सूरज बहजात्या यांचा सिनेमा 'मैंने प्यार किया'मध्ये सलमान खानने लीड रोलमधून खऱ्या अर्थाने अभिनयाला सुरूवात केली. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर पुढील 6 महिन्यांपर्यंत कोणत्याही सिनेमाची ऑफर आली नाही. 

4/9

सलमान खानला पेटिंगची खूप आवड आहे. अगदी कमी वेळात तो सुंदर चित्र रेखाटतो आणि याचा अनुभव आता देखील आपण घेतला आहे. अर्पिताच्या मुलासोबत सलमान खान एकदा पेटिंग करताना दिसला होता. 

5/9

'जय हो' या सिनेमाचं पोस्टर स्वतः सलमान खानने पेंट केलं होतं. स्विमिंग, पेटिंगसोबत सलमान खानने स्क्रिप्टिंगमध्ये देखील आवड जोपासण्याचा प्रयत्न केलाय. 'वीर' सिनेमाची स्क्रिप्ट स्वतः दबंग खानने लिहिली आहे.

6/9

सलमान खान BMW गाड्यांचा मोठा चाहता आहे. पण तुम्ही हे वाचून हैराण व्हाल की सलमान खानला Soaps ची देखील मोठी आवड आहे. त्याच्या बाथरूममध्ये  वेगवेगळ्या सुगंधाचे खूप साबण असतात. 

7/9

आतापर्यंत लाखो लोकांना सलमान खानने मदत केली आहे. पण स्वतः सलमान खान trigeminal neuralgia या आजाराने ग्रस्त आहे. हा आजार आत्महत्येच्या नावाने देखील ओळखला जातो. सलमान खानने सांगितलं की, या आजारामुळे त्याला एक अंड खाण्यासाठी खूप वेळ देखील लागतो. 

8/9

सलमान खानने आतापर्यंत अनेक मुलींना डेट केलं आहे अगदी यामध्ये ऐश्वर्या रायचं देखील नाव आहे. पण सलमान खानची पहिली पसंत कोण होती माहित आहे का? शाहीन जाफरी असं त्या व्यक्तीचं नाव आहे. 

9/9

सलमान खानचं पहिलं प्रेम संगीत बिजलानी नसून शाहीन जाफरी आहे. सलमान खान तेव्हा सेंट झेवियर्स कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला होता. सलमान खान शाहीनचा कॉलेज बाहेर लाल रंगाच्या स्पोट्स कारमध्ये वाट बघत बसायचा.