PHOTOS: लग्नाची वरात अन् उंटावरून नवरदेव दारात

बँड बाजा बारात सर्वकाही गाजावाजा होता पण नवरदेव मात्र घोड्याऐवजी उंटावरून आला

Mar 05, 2021, 08:48 AM IST

विष्णू बुर्गे, झी मीडिया, बीड: बैलगाडी किंवा घोड्यावरून वरात आलेली आपण बऱ्याचवेळा पाहिली असेल पण आता उंटावरून वरात काढली आहे. ही घटना महाराष्ट्रातली आहे.

1/7

आतापर्यंत आपण घोड्यावरून किंवा बैलगाडीतून लग्नाच्या वरातीत किंवा नवरदेव नवरीला घेऊन जाणाऱ्यासाठी येताना पाहिलं असेल पण एक अजबच प्रकार घडला आहे. घोडा किंवा बैलगाडी नाही तर चक्क उंटावरून नवरदेव आला.

2/7

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि मित्र मंडळ आणि गर्दीपासून लांब राहण्यासाठी ही अजब शक्कल लढवली. नवरदेव घोड्याऐवजी थेट उंटावरून आला.   

3/7

बीडच्या केज तालुक्यातील साळेगाव येथील माजी सैनिक महादेव  वरपे यांचे चिरंजीव अक्षय वरपे यांचा विवाह उस्मानाबाद जिल्ह्यातील खामसवाडी इथल्या ऐश्वर्या हिच्याशी संपन्न झाला.

4/7

 वराचे आई-वडील आणि त्यांचे मामा, मेव्हणे आणि मित्र यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम आणि दक्षता पाळूनही गर्दी आणि नवरदेवाशी वरातीत लोकांचा संपर्क येऊ नये यासाठी नवरदेवाला घोड्यावर न बसवता चक्क उंटावर बसवून वरात काढली.

5/7

गाव आणि तालुक्यातून निघालेल्या या उंटाच्या वरातीची मात्र जगभर चर्चा झाली. 

6/7

उंटावरून निघालेल्या वरातीचे फोटो आणि व्हिडीओ मात्र सोशल मीडियावर खास चर्चेचा विषय झाले.   

7/7

वधू-वरांच्या आई-वडिलांनी त्यांच्या नातेवाईक आणि मित्र मंडळींना कोरोना आणि साथ रोगाच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये म्हणून प्रत्यक्ष लग्नाला हजर न रहाता फोन वरून शुभेच्छा दिल्या.