चवीला कडू असले तरी आरोग्यासाठी हेल्दी आहेत हे 5 पदार्थ

जर तुम्ही चवीनुसारच कोणताही पदार्थ खात असाल तर ही सवय बदलायला हवी. कारण काही कडवत पदार्थ असे आहेत. जे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात. ज्यामुळे त्याचा तुमच्या आहारात समावेश केला पाहिजे. कोणताही पदार्थ खातांना आपण त्याची चव कशी आहे. यानुसार तो खातो. खासकरुन गोड, आंबट किंवा खारट असेल तर तो पदार्थ आपण आवडीने खातो, पण जर त्याची चव कडू असेल तर तो पदार्थ खाणे आपण शक्यतो टाळतोच. आयुर्वेदात 6 चवींचा उल्लेख आहे - गोड, आंबट, खारट, तिखट, तुरट आणि कडू. यामध्ये कडवत चव पित्त आणि कफ सारख्या आजारा पासून आपल्याला लांब थेवते. त्यामुळे आम्ही तुम्हाला अशा 5 कडू गोष्टींबद्दल सांगणार आहोत.

Mar 04, 2021, 22:23 PM IST

जर तुम्ही चवीनुसारच कोणताही पदार्थ खात असाल तर ही सवय बदलायला हवी. कारण काही कडवत पदार्थ असे आहेत. जे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात. ज्यामुळे त्याचा तुमच्या आहारात समावेश केला पाहिजे. कोणताही पदार्थ खातांना आपण त्याची चव कशी आहे. यानुसार तो खातो. खासकरुन गोड, आंबट किंवा खारट असेल तर तो पदार्थ आपण आवडीने खातो, पण जर त्याची चव कडू असेल तर तो पदार्थ खाणे आपण शक्यतो टाळतोच. आयुर्वेदात 6 चवींचा उल्लेख आहे - गोड, आंबट, खारट, तिखट, तुरट आणि कडू. यामध्ये कडवत चव पित्त आणि कफ सारख्या आजारा पासून आपल्याला लांब थेवते. त्यामुळे आम्ही तुम्हाला अशा 5 कडू गोष्टींबद्दल सांगणार आहोत. ज्याची चव भलेही कडू आहे पण तुमच्या आरोग्यासाठी ते फायदेशीर आहे.

1/5

Apple सायडर व्हिनेगर

Apple सायडर व्हिनेगर

ग्रीन टी सोबत Apple सायडर व्हिनेगरही सध्या पॉप्युलर ड्रिंक झाली आहे. या मध्ये antimicrobial आणि Anti-oxidant आहेत जे वजन कमी करायला मदत करतेच पण त्या सोबत Cholestrol पण कमी करते, Blood Sugar कमी करते आणि Bacteria ला पण मारण्यात मदत करते. पण 1 ते 2 चम्मच हुन जास्त Apple सायडर व्हिनेगर घेणं टाळलं पाहिजे. (टीप: कोणताही उपाय करण्यापूर्वी नेहमीच एखाद्या विशेषज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. Zee news या बाबत कोणताही ठोस दावा करत नाही.)

2/5

ग्रीन टी

ग्रीन टी

सध्या पॉप्युलर ड्रिंक म्हणजेच ग्रीन टी मानली जाते. ग्रीन टी मध्ये असलेले polyphenols आणि catechin मुळे त्याची चव थोडी कडू आहे. ग्रीन टी फक्त वजन कमी करण्यासाठी नाही तर त्याचे अनेक फायदे देखील आहेत. ग्रीन टी मध्ये असलेले Anti-oxidant बऱ्याच प्रकारच्या Cancer रोगापासून वाचवता. हृदय रोगही लांब ठेवते. पण ईथे Quantity कडे लक्ष देणं आवश्यक आहे.

3/5

कॉफी

कॉफी

बर्‍याच कडू पदार्थांप्रमाणेच कॉफीमध्येही पॉलिफेनॉल्स असतात. हा Anti-oxide चा एक प्रकार आहे जो शरीरात ऑक्सिडेटिव्ह डॅमेजला रोखतो.हृदयरोग आणि Diabities  सारख्या आजारांचा धोका कमी करतो. बर्‍याच संशोधनामधून असे ही समोर आले आहे की दररोज 1 कप कॉफी पिल्याने Diabities, Cancer आणि Heart Attack चा धोका कमी होतो. कॉफी फायदेशीर आहे, याचा अर्थ असा नाही की आपण दिवसभर कॉफी प्यायला हवी. मर्यादित प्रमाणात घेतल्यानेच कोणत्याही गोष्टीचा फायदा होतो. कॉफीची कडू चव फायदेशीर असते. त्यामुळे त्यात दूध, साखर किंवा मलई मिसळून त्याची चव बदलू नका.

4/5

मेथीचे दाणे

मेथीचे दाणे

मेथीचे दाणे सहज कच्चे खाणे सर्वांसाठी सोपी गोष्ट नाही. कारण त्याची चव खुपच कडू असते. पण हीच कडू मेथीमध्ये Minerals,Fiber,Vitamins असतात. आयुर्वेदात रक्तातील साखरेची पातळी याच्यामुळे सुधारवते . याशिवाय मेथीचे दाणे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही मदत करतात.  

5/5

कारलं

कारलं

कडू कारलं अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. त्यात फायबर, Vitamin A, Vitamin C सोबत Anti-oxide भरपूर असतात. तसेच कॅलरी कमी असतात. म्हणून जर आपण वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर या क़डू पदार्थाला आपल्या आहारातला एक भाग बनवा. डायबिटीज रूग्णांसाठीही कारलं खूप फायदेशीर आहे. त्यामुळे पुढच्या वेळी नाक मुरडण्यापेक्षा कारल्याची भाजी नक्की खा.