सावधान! स्वत: मध्ये तुम्हाला दिसतायत 'ही' 5 लक्षणं... कामातून ब्रेक घेण्याची हीच योग्य वेळ

सध्या सगळ्यांचं धावपळीचं आयुष्य आहे. अनेकदा आपण कामात राहतो आणि आपल्या जागेवरून उठायला सुद्धा विसरतो. आपल्या प्रत्येकावर असणारं कामाचं प्रेशर हे आपल्याला खूप स्लो करतात किंवा आपण इतर गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकत नाही. मग अशी कोणती लक्षण आहेत जी आपल्यात दिसली की आपण ब्रेक घेणं गरजेचं आहे. हे आज जाणून घेऊया. 

| Dec 31, 2023, 08:00 AM IST
1/7

जीवनातील आनंद होतो नाहीस

सतत कामात व्यस्त राहिल्यानं आपण पूर्णवेळ त्यात गुंतून राहतो आणि आपण आनंदी सुद्धा राहत नाही.   

2/7

विश्रांतीची गरज

जर खालीली दिलेली लक्षण तुमच्यात दिसली तर तुम्हाला एका मोठ्या ब्रेकची गरज आहे. हे लक्षात घ्या.

3/7

एकाग्रता कमी होणे

जर तुम्हाला एकाग्रता करण्यास समस्या होत असेल किंवा गोष्टी विसरत असाल, तर हा तुम्हाला यापैकी असलेला एक संकेत आहे. त्यासाठी तुम्ही योगा करणं गरजेचं आहे.   

4/7

चिडचिड होणे

सतत कोणत्याही छोट्या कारणावरून देखील तुमची चिडचिड होत असेल तर तुम्हाला एक गोष्ट लगेच जाणवेल ती म्हणजे तुमच्यात असलेल्या स्थिरतेची कमी. यासाठी तुम्ही तुमच्या मित्रांना भेटा आणि त्यांच्यासोबत छान वेळ व्यथित करा.

5/7

अशक्तापणा

तुम्हाला नेहमीच अशक्तापणा जाणवत असेल तर तुम्ही एखाद्या गंभीर समस्येचा सामना करत आहात. त्यामुळे डोळे जड होणं, डोके दुखी, अंगदुखी, मानसिक थकवा जाणवतो. अशा परिस्थितीत तुम्ही चांगली झोप काढणं गरजेचं आहे.

6/7

निराश वाटणे

साधारणपणे तरुण वयात माणूस आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यास तयार असतो. पण जेव्हा तुम्ही आयुष्याच्या अशा टप्प्यावर पोहोचता की तुम्हाला छोटी कामे करावीशी वाटत नाहीत, तेव्हा तुम्हाला सोपी कामे करण्यासाठीही प्रेरणा हवी असते ही पुरेशी चिन्हे आहेत ज्यासाठी तुम्हाला विश्रांतीची आवश्यकता आहे.

7/7

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ते अवलंबण्यापूर्वी, नक्कीच वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)