एमएस धोनीचा फेव्हरेट, चेन्नईचा हुकमी एक्का अडकला लग्नबंधनात, पाहा Photo

Tushar Deshpande Wedding : भारतीय क्रिकेट संघासाठी हे वर्ष लग्नाचं ठरलंय. तब्बल सात खेळाडूंनी यंदा विवाह उरकला, आता यात आणखी एका खेळाडूची भर पडलीय. आयपीएलमधल्या चेन्नई सुपर किंग्सजचा हुकमी एक्का आणि कर्णधार एमएस धोनीचा फेव्हरेट तुषार देशपांडे लग्नबंधनात अडकला आहे. 

| Dec 21, 2023, 16:38 PM IST
1/7

आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज आणि एमएस धोनीचा फेव्हरेट तुषार देशपांडे लग्नाच्या बंधनात अडकला आहे.  

2/7

तुषार देशपांडेचा नभा गडांमवार हिच्यासोबत ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्याला मोजक्या लोकांची उपस्थिती होती.

3/7

तुषार आणि नभा यांचं कॉलेजपासूनचे प्रेमसंबंध आहेत. नभा ही उत्तम चित्रकार आणि फॅशन डिझाईनर आहे.  

4/7

इन्स्टाग्रामवर नभाच चित्रकलेचं पेज आहे. यार ती  स्वतः केलेल पेंटिंग्ज आणि तिच्या डिझाइनचे फोटो शेअर करते.

5/7

तुषार-नभाच्या लग्नाला शिवम दुबे, धवव कुलकर्णी, भावीन ठक्कर, प्रशांत सोलंकी, विनायक माने इत्यादी खेळाडू आवर्जुन उपस्थित होते.

6/7

तुषार देशपांडे हा आयपीएल 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला होता.

7/7

तुषारचं शालेय शिक्षण कल्याणमधल्या केसी गांधी शाळेत झालं. चौथीत असताना त्याला 14 वर्षाखालील क्रिकेट सामन्यात खेळण्याची संधी मिळाली