पत्रकार परिषदेत भडकला बाबर आझम, मित्रावर प्रश्न विचारताच संतापला

वर्ल्डकपमध्ये सहभागी होण्यासाठी पाकिस्तानचा संघ मंगळवारी रात्री भारतात रवाना होणार आहे. त्याआधी कर्णधार बाबर आझमने पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्याने वर्ल्ड कपची तयारी, शाहीन आफ्रिदीसोबतच्या मतभेदाच्या बातम्या अशा अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी पाकिस्तानच्या कमकुवत फिरकी गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असता बाबर संतापला.

Sep 26, 2023, 17:11 PM IST

World Cup 2023: वर्ल्डकपमध्ये सहभागी होण्यासाठी पाकिस्तानचा संघ मंगळवारी रात्री भारतात रवाना होणार आहे. त्याआधी कर्णधार बाबर आझमने पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्याने वर्ल्ड कपची तयारी, शाहीन आफ्रिदीसोबतच्या मतभेदाच्या बातम्या अशा अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी पाकिस्तानच्या कमकुवत फिरकी गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असता बाबर संतापला.

 

1/7

पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमने विश्वचषकासाठी भारतात रवाना होण्यापूर्वी पत्रकार परिषद घेतली.  

2/7

यामध्ये त्याने भारतात होणार वर्ल्डकप, टीम मधील कमकुवतपणा, शाहीन आफ्रिदीसोबतचे मतभेद या सर्व प्रश्नांची मोकळेपणाने उत्तरे दिली.  

3/7

बाबर आझम म्हणाला, 'आम्ही मधल्या षटकांमध्ये विकेट घेऊ शकत नाही हे खरे आहे. पण याचा अर्थ आमचे खेळाडू वाईट झाले असे नाही. हे  तेच खेळाडू आहेत  ज्यांनी  पाकिस्तानला नंबर-1 बनवले आहे. मला माझ्यापेक्षा माझ्या १५ खेळाडूंवर जास्त विश्वास आहे.'   

4/7

पत्रकार परिषदेत पाकिस्तानच्या कमकुवत फिरकी गोलंदाजीच्या प्रश्नावर बाबर थोडा अस्वस्थ दिसला.  

5/7

त्याने पत्रकारालाच विचारले की चांगले फिरकीपटू कोण आहेत ते सांगा? माझ्या दृष्टीने आमचे फिरकीपटू सर्वोत्तम आहेत. पाकिस्तानचा आताचा फॉर्म काहीसा खराब असला तरीही आम्ही पूर्ण ताकदीनिशी वर्ल्ड कप जिंकण्याचा प्रयत्न करू.   

6/7

शाहीन आफ्रिदीसोबतच्या वादाशी संबंधित प्रश्नावर बाबर आझम म्हणाला, 'जेव्हा आम्ही सामना हरतो, तेव्हा आम्ही टीम मीटिंगमध्ये बोलतो.  

7/7

त्याच्यासोबतही अशीच चर्चा झाली होती पण माध्यमांनी ती अतिशयोक्तीपूर्ण दाखवली. माझे शाहीनवर प्रेम आहे.'