समुद्रतळाशी आढळली बेली कॉम्ब जेली फिश; इंद्रधनुष्यही याच्या सौंदर्यासमोर पडेल फिके
समुद्राच्या तळाशी इतके जीव आहे की दररोज नवनवीन बाबी समोर येतायेत. संशोधकांना समुद्राचं गूढ अद्याप उकललेलं नाही. अशातच समुद्रात डायव्हिंग करणा-या एका टीमनं इंद्रधनुष्याप्रमाणे चमकणारा मासा कॅमे-यात कैद केलाय.
Belly Comb Jellyfish Rainbow Colours : निसर्गाची अनेक रहस्यं समुद्राच्या तळाशी दडलेली आहेत. समुद्रात जितकं खोलवर जाल, तितक्या आत नवनवीन चमत्कारीक गोष्टी दिसू लागतात. सागराच्या पोटात असे अनेक जीव आहेत. ज्यांच्याबद्दल आपण फक्त कथांमधून ऐकलं असेल किंवा पुस्तकातूनच वाचलं असेल. अनेकदा असे जीव समुद्रातही पाहायला मिळतात ज्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे...मात्र आपल्या खास वैशिष्ट्यांमुळे हे प्राणी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतात. असाच एक आश्चर्यकारक प्राणी म्हणजे रक्तरंजित बेली कॉम्ब जेली.