मतदान ओळखपत्रासाठी 'असा' करा ऑनलाइन अर्ज आणि डाऊनलोड

 मतदारांनी त्यांचे मतदान पत्र कसे बनवायचे? कसे डाऊनलोड करायचे? याबद्दल जाणून घेऊया. 

| Mar 16, 2024, 18:13 PM IST

Voter ID card Online Download: मतदारांनी त्यांचे मतदान पत्र कसे बनवायचे? कसे डाऊनलोड करायचे? याबद्दल जाणून घेऊया. 

1/9

Voter ID card Online Download: महाराष्ट्रासह देशभरातील लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सात टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. पहिला टप्पा 19 एप्रिलपासून सुरु होणार आहे. तसंच 4 मे रोजी देशात मतमोजणी होईल.  महाराष्ट्रात 19, 26 एप्रिल तसंच 7, 13 आणि 20 मे रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील एका जागेवर पोटनिवडणूक होणार आहे.  दरम्यान मतदारांनी त्यांचे मतदान पत्र कसे बनवायचे? कसे डाऊनलोड करायचे? याबद्दल जाणून घेऊया. 

2/9

आवश्यक दस्तावेज

How to Apply Voter ID card Online downloaded follow these easy steps

18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या प्रत्येक नागरिकासाठी मतदार ओळखपत्र हे आवश्यक दस्तावेज आहे. असे असले तरी अनेकांकडे मतदान ओळखपत्र नसते. तर काहींचे कार्ड हरवलेले असते. 

3/9

ऑनलाइन डाउनलोड

How to Apply Voter ID card Online downloaded follow these easy steps

मतदार ओळखपत्र ऑनलाइन डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. यानंतर काही मिनिटांत तुमचे मतदान ओळखपत्र डाउनलोड करु शकाल. 

4/9

मतदार ओळखपत्र म्हणजे काय?

How to Apply Voter ID card Online downloaded follow these easy steps

मतदार ओळखपत्र हे भारतीय नागरिकांसाठी आवश्यक कागदपत्र आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी मतदान ओळखपत्र जारी केले जाते. मतदानासोबतच ओळख आणि पत्त्याचा पुरावा म्हणून याचा वापर केला जातो.

5/9

ऑनलाइन अर्ज

How to Apply Voter ID card Online downloaded follow these easy steps

यासोबतच मतदान ओळखपत्राचा वापर अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी केला जातो. मतदान ओळखपत्र ऑनलाइन अप्लाय करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा. 

6/9

OTP टाकून नोंदणी

How to Apply Voter ID card Online downloaded follow these easy steps

सर्वप्रथम मतदार सर्व्हिस पोर्टलवर जा. 'साइन अप' वर होमपेजच्या उजव्या बाजूला क्लिक करा. आता लॉगिन मोबाईल नंबर, पासवर्ड, कॅप्चा आणि OTP टाकून नोंदणी करा.

7/9

‘फिल फॉर्म 6

How to Apply Voter ID card Online downloaded follow these easy steps

आता तुमच्या समोर ‘फिल फॉर्म 6’ दिसेल. यानंतर 'न्यू रजिस्ट्रेशन फॉर जनरल इलेक्टोर्स वर क्लिक करा. कागदपत्रे फॉर्म 6 मध्ये अपलोड करून सबमिट करा.

8/9

EPIC क्रमांक

How to Apply Voter ID card Online downloaded follow these easy steps

मतदार ओळखपत्र ऑनलाइन डाउनलोड करण्यासाठी 'लॉग इन' वर टॅप करा आणि मोबाइल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा टाका. तुमच्या नंबरवर एक ओटीपी येईल. ज्याद्वारे व्हेरिफाय आणि लॉगिन करा.‘E-EPIC डाउनलोड’ टॅबवर क्लिक करा. 'EPIC No' नंबर निवडा. EPIC क्रमांक टाका आणि तुमचे राज्य निवडा.

9/9

मतदान ओळखपत्र डाऊनलोड

How to Apply Voter ID card Online downloaded follow these easy steps

आता तुमच्या मतदार ओळखपत्राचा तपशील दिसेल. OTP टाकून पुढे जा. आता तुम्हाला ‘डाऊनलोड e-EPIC’ चा पर्याय दिसेल. यावर क्लिक करुन तुमचे मतदान ओळखपत्र डाऊनलोड करा.