Job Hopping : तुम्हीही सतत नोकरी बदलता का? याचा फायदा- तोटा एकदा पाहाच

Jul 27, 2022, 12:55 PM IST
1/5

Job Hopping : तुम्हीही सतत नोकरी बदलता का? याचा फायदा- तोटा एकदा पाहाच

Job News : सध्याच्या तरुणाईच्या तुलनेत त्यांच्याहून मोठी मंडळी नोकरीच्या बाबतीत सतत उड्या मारणाऱ्यांपैकी नव्हती. एकाच ठिकाणी अनेक वर्षे नोकरी करत, थेट निवृत्तीवेतन वगैरे घेत ही पिढी नोकरीला पूर्णविराम देत होती. तुलनेने नवी पिढी मात्र पगारवाढ, करिअरच्या नव्या आणि चांगल्या संधी, नेतृत्त्वाची संधी आणि कंपनीकडून मिळणारे पगारेतर फायदे पाहता पटापट नोकऱ्या बदलताना दिसते.     

2/5

Job Hopping : तुम्हीही सतत नोकरी बदलता का? याचा फायदा- तोटा एकदा पाहाच

काहीजण तर, वर्षभरातच काय तर अवघ्या दोन- चार महिन्यांतही नोकरी बदलण्याचा निर्णय घेतात. अर्थात यासाठी त्यांनी विचारही केलेला असतो. पण, वारंवार नोकरी बदलण्याचे काही फायदे आणि तोटेही आहेत. त्यावर लक्ष देणंही तितकंच महत्त्वाचं.  कामाचा वाढता व्याप पाहता नोकरी बदलणाऱ्यांची संख्या जास्त. पण, असं केल्याच तुमची नोकरीच्या क्षेत्रातील प्रतीमा मलिन होते. दीर्घकाळासाठी न टीकणाऱ्या उमेदवारांना नोकरीच्या संधी देताना कंपनी दोनदा विचार करते. अनेकदा अशा मंडळींना नोकरी मिळण्यातही अडचणी येतात. 

3/5

Job Hopping : तुम्हीही सतत नोकरी बदलता का? याचा फायदा- तोटा एकदा पाहाच

काही तज्ज्ञांच्या मते करिअरमध्ये विश्रांती घेणंही महत्त्वाचं. नोकरी करणाऱ्यांसाठी हे फायद्याचं असलं तरीही पगारवाढीसाठी किंवा एखाद्या ठिकाणाच्या कारणावरून हा अल्पविराम घेऊ नये. बरेचजण हल्ली  डाउनसाइजिंग, शॉर्ट कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झाल्यानंतर, फिरण्यासाठी किंवा मग स्वत:चं काहीतरी नवं सुरु करण्यासाठी करिअरला ब्रेक देतात. हा निर्णय बऱ्याचदा फायद्याचा ठरतो.  

4/5

Job Hopping : तुम्हीही सतत नोकरी बदलता का? याचा फायदा- तोटा एकदा पाहाच

नोकरी बदलताना कंपनीविषयी नकारात्मक वक्तव्य करणं, त्या ठिकाणी त्यांच्या परतीच्या वाटा बंद करण्यास कारणीभूत ठरू शकतं. तुमच्याकडे एखादं मोठं आणि योग्य कारण नसल्यास वारंवार नोकरी बदलू नका.   

5/5

Job Hopping : तुम्हीही सतत नोकरी बदलता का? याचा फायदा- तोटा एकदा पाहाच

एखाद्या ठिकाणी तुम्ही नोकरीसाठी गेल्यास अनुभवामध्ये सतत नोकऱ्या बदलण्याचा उल्लेख असाल तर समोरची कंपनी तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. या वळणावर तुमच्या करिअरला ब्रेकही लागण्याची भीती असू शकते. त्यामुळं पूर्ण विचार करा, सल्ले घ्या आणि नंतरच नोकरी बदलण्याचा निर्णय घ्या.