रिकाम्या पोटी खजूर खाण्याचे 'इतके' फायदे, आजपासूनच करा सुरुवात

Eating Dates: पोटाच्या विकाराने त्रास असलेल्यांनी सकाळी खजूर जरूर खावे. यामध्ये असलेल्या फायबरमुळे पचन आणि आतड्याची प्रक्रिया सुलभ होते. ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या दूर होते.

| Aug 18, 2023, 10:28 AM IST

Eating Dates Empty Stomach: खजुरामध्ये फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी 6 आणि लोह मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे डॉक्टरही आपल्याला खजूर खाण्याचा सल्ला देतात. पण गोड फळ रोज सकाळी रिकामी पोटी खाल्ल्यास त्याचा शरीरावर किती सकारात्मक परिणाम होतो? याबद्दल जाणून घेऊया. 

1/6

रिकाम्या पोटी खजूर खाण्याचे 'हे' फायदे, आजपासूनच करा सुरुवात

Benefits of Eating Dates Empty Stomach Health Tips in Marathi

Eating Dates Empty Stomach: खजूर खाणे आरोग्यासाठी केव्हाही फायदेशीर असते हे आपल्या सर्वांनाच माहिती असेल. खजुरामध्ये अनेक पोषक घटक असतात जी शरीरासाठी फायदेशीर ठरतात. खजुरामध्ये फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी 6 आणि लोह मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे डॉक्टरही आपल्याला खजूर खाण्याचा सल्ला देतात. पण गोड फळ रोज सकाळी रिकामी पोटी खाल्ल्यास त्याचा शरीरावर किती सकारात्मक परिणाम होतो? याबद्दल जाणून घेऊया. 

2/6

वजन आटोक्यात

Benefits of Eating Dates Empty Stomach Health Tips in Marathi

सकाळी रिकाम्या पोटी खजूर खाल्ल्याने तुमचे वजन कमी होऊ लागते, त्यामुळे जे लोक वजन कमी करण्याचा विचार करत आहेत त्यांनी सकाळी झोपेतून उठल्यानंतर खजूर खाणे आवश्यक आहे. कारण यामुळे जास्त वेळ भूक लागत नाही. यामुळे तुमचे वजन आटोक्यात राहील. 

3/6

दिवसभर ऊर्जा

Benefits of Eating Dates Empty Stomach Health Tips in Marathi

रोज रिकाम्या पोटी खजूर खाल्ल्यास दिवसभर शरीरात ऊर्जा टिकून राहते. खरं तर, या गोड फळामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. ज्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते आणि तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळते.

4/6

पचनक्रिया सुधारेल

Benefits of Eating Dates Empty Stomach Health Tips in Marathi

पोटाच्या विकाराने त्रास असलेल्यांनी सकाळी खजूर जरूर खावे. यामध्ये असलेल्या फायबरमुळे पचन आणि आतड्याची प्रक्रिया सुलभ होते. ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या दूर होते.

5/6

गोडाची लालसा कमी

Benefits of Eating Dates Empty Stomach Health Tips in Marathi

आपल्यापैकी अनेकजण असे आहेत जे मिठाई खाल्ल्याशिवाय राहू शकत नाहीत. परंतु या सवयीमुळे लठ्ठपणा आणि मधुमेहासारख्या समस्या उद्भवतात. म्हणूनच तुमच्यासाठी खजूर हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो. यामुळे गोडाची लालसा कमी होते आणि तुम्ही जास्त गोड खाणे टाळता.

6/6

वैद्यकीय सल्ला आवश्यक

Benefits of Eating Dates Empty Stomach Health Tips in Marathi

(Disclaimer- येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. Zee 24 Taas याची पुष्टी करत नाही.)