पूर्वज सांगायचे खाली बसून जेवल्याने जेवण अंगी लागतं! खरंच असं होतं का?

जमिनीवर बसून जेवण केल्याने नक्की काय फायदे होतात त्याविषयी या लेखात माहिती घेऊ या...

Apr 22, 2021, 08:03 AM IST

भारतात पूर्वीपासून जेवण करताना मांडी घालून जमिनीवर बसण्याची पद्धत आहे. आजही बहुतांश घरांमध्ये जेवण करताना अशीच पद्धत अस्तित्वात आहे.
 जेवण करण्याआधी प्रार्थना म्हणण्याचीही पद्धत होती. परंतू कालांतराने तिचा विसर आता भारतीयांना पडतोय.
 सध्याच्या मॉडर्न युगात डायनिंग टेंबलवर बसून जेवणाची पद्धत सुरू सुरू आहे. काही जणांनातर बेडवर बसल्या बसल्या जेवणाची सवय झाली आहे. परंतु जमिनीवर बसून जेवण करण्याचे कोणते फायदे आहेत. ते पाहूयात.

1/6

 फक्त भारतीयच नाही तर जपानी लोकसुद्धा जमिनीवर बसून  जेवण करतात  नक्की काय आहे यामागचे कारण?  मांडी घालून जमिनीवर बसण्याच्या पद्धतीला सुखासन म्हटले जाते. योगाबद्दल माहिती असणारे या आसनाला पद्मासनाच्या जवळपास मानतात. या आसनाला अभ्यासक ध्यानाची पहिली पायरी म्हणतात.  एका लेखानुसार मानवाचे शरीर खुर्चीवर बसण्यासाठी बनलेले नाही. परंतु आपण आपल्या आरामासाठी खुर्चीवर बसण्याची सवय लावून घेतली आहे.

2/6

खाली बसून जेवणाचे फायदे  1. पचनशक्तीला फायदेशीर  गुरूद्वाराचा लंगर किंवा मंदिराच्या भंडाऱ्याच्या ठिकाणी लोकांना जेवण बसूनच वाढले जाते. अशा वेळी आपण जेवण करताना पुढील बाजूस झुकतो. त्यानंतर पुन्हा जैसे थे होतो. त्यामुळे जेवण उत्तम रित्या पचण्यास मदत होते.

3/6

2. शरीराचे आकारमान   लॅपटॉपवर काम करून बहुतांश जणांच्या शरीराचा आकार चुकीचा (Posture Dull) होत आहे.  त्यामुळे पाठ दुखीचा त्रास, कंबर दुखीचा त्रास वाढला आहे. आधीच्या काळात या समस्या कमी प्रमाणात जाणवत असत. जमिनीवर बसून जेवल्याने बॉडी पोस्चर योग्य होते.

4/6

3. रक्ताचे अभिसरण उत्तम होते.  आपल्या शरीराचे नियमन तेव्हाच योग्यरित्या होऊ शकते. ज्यावेळी आपले रक्ताचे अभिसरण शरिरात योग्य होते. बैठ्या आसन व्यवस्थेत जेवल्याने रक्ताभिसरण योग्य होते.

5/6

4 नम्रता वाढते  भिक्षुक, साधू - संत नेहमी जमिनीवर बसून तपस्या करतात. खुर्चीवर बसून करीत नाहीत. त्यामुळे खाली बसून जेवल्याने कुटूंबाशी संबध चांगले राहतातच परंतू सोबतच नम्रताही वाढते.

6/6

5. शरीर मजबूत  होते.  खाली बसून जेवल्याने Lower Back, pelvis, पोटाच्या जवळपास असलेल्या मांसपेशी ओढल्याने अंगदुखी कमी होते.