कोलकात्यात चाललंय तरी काय? अभिनेत्रीवर हल्ला; कार फोडली, रहस्यमय पदार्थ टाकून..; FB Live वर ढसाढसा रडली

Bengali Actress Car Attacked In Kolkata: सध्या महिला डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे देशभरात चर्चेत असलेल्या कोलकात्यामध्ये पुन्हा एकदा एक विचित्र तसेच भयानक प्रकार घडला असून आता थेट एका अभिनेत्रीच्या कारवर हल्ला करण्यात आला आहे. अभिनेत्रीनेच यासंदर्भातील माहिती शेअर केली आहे. ही अभिनेत्री कोण आणि तिच्याबरोबर नेमकं काय घडलं पाहूयात...

| Aug 24, 2024, 07:14 AM IST
1/10

ActressPayelMukherjeeAttacked

कोलकात्यामधील आर. जी कर रुग्णालयातील बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे पश्चिम बंगालची राजधानी चर्चेत असतानाच दुसरीकडे याच राज्यातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या गाडीवर हल्ला करण्यात आल्याचा प्रकार आता समोर आला आहे. या अभिनेत्रीने फेसबुक लाइव्हवरुन तिच्याबरोबर काय घडलं हे सांगितलं. मात्र ही अभिनेत्री आहे तरी कोण आणि तिच्या कारवर हल्ला का झाला? पाहूयात...  

2/10

ActressPayelMukherjeeAttacked

कोलकात्यामधील बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा सध्या कळीचा विषय ठरत आहे. असं असतानाच पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध अभिनेत्री पायल मुखर्जीवर हल्ला झाला आहे. काही बाईकस्वारांनी तिच्या कारवर हल्ला केला.   

3/10

ActressPayelMukherjeeAttacked

पायल मुखर्जीने फेसबुक लाइव्हवरुन या हल्ल्याची माहिती दिली. या हल्ल्यामुळे चर्चेत आलेली पायल मुखर्जी नेमकी आहे तरी कोण? तिने व्हिडीओत नक्की काय सांगितलं आहे? हे जाणून घेऊयात..  

4/10

ActressPayelMukherjeeAttacked

पायल मुखर्जीने दिलेल्या माहितीनुसार ती कोलकात्यामधील साऊथ एव्हेन्यू येथून जात असताना तिच्याबरोबर हा प्रकार घडला. अचानक एक बाईक तिच्या कारला धडकली. या धडकेनंतर बाईकस्वाराने पायलला काच खाली कर असं इशाऱ्याने सांगितलं.

5/10

ActressPayelMukherjeeAttacked

मात्र पायल मुखर्जीने काच खाली न केल्याने या व्यक्तीने काचेवर बुक्का मारला आणि काच फोडली. त्यानंतर त्याने पांढऱ्या रंगाचा पावडरसारखा रहस्यमय पदार्थ गाडीवर फेकला आणि तिथून पळ काढला, असं पायल म्हणाली.

6/10

ActressPayelMukherjeeAttacked

पायल मुखर्जी आपल्या या फेसबुक लाइव्हमध्ये मोठमोठ्याने रडत होती. मला फार जास्त भिती वाटत आहे, असं तिने सांगितलं. मात्र त्याचवेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत काही वेळात आरोपीला अटक केली.

7/10

ActressPayelMukherjeeAttacked

पायल मुखर्जीने बंगली चित्रपटांबरोबर दक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केलं आहे. मागील अनेक वर्षांपासून ती मनोरंजन क्षेत्रात सक्रीय आहे. 'द सीवेज ऑफ रोबिन हुड', 'गिरगिट' आणि 'श्रीरंगपुरम' सारख्या चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे. 'वो तीन दिन' या हिंदी चित्रपटामध्ये पायलन संजय मिश्रा यांच्याबरोबर काम केलं आहे.   

8/10

ActressPayelMukherjeeAttacked

पायल मुखर्जी सध्या 'अंतर युद्ध', 'इन सर्च ऑफ सनशाइन', 'नॉन स्टॉप धमाल' आणि 'पुल्लू' या प्रोजेक्टवर काम करत असून लवकरच या सर्व चित्रपटांच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  'नॉन स्टॉप धमाल'मध्ये ती राजपाल यादवबरोबर दिसणार आहे. 2007 पासून ती अभिनय श्रेत्रात कार्यरत आहे.   

9/10

ActressPayelMukherjeeAttacked

पायल मुखर्जी सोशल मीडियावर फार सक्रीय आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 2.2 लाख फॉलोअर्स आहेत. जुलैमध्ये प्रदर्शित झालेल्या अल्तमश फरिदीच्या गाण्यामध्ये पायल ग्लॅमरस लूकमध्ये दिसली होती.   

10/10

ActressPayelMukherjeeAttacked

पायल मुखर्जीने काही दिवसांपूर्वीच कोलकात्यामधील बलात्कार प्रकरणावर भाष्य केलं होतं. रोज मरण पावलेल्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. हे फार लज्जास्पद आहे. आपण या देशाचे नागरिक असूनही असं कृत्य करत आहोत, असं म्हणत तिने कोर्टातील सुनावणीचा एक व्हिडीओ पोस्ट केलेला.