फायर पानच्या आगीने तोंड भाजू शकत का? जाणून घ्या अमेझिंग फॅक्ट्स

Fire Paan Amazing Facts:खाण्याव्यतिरिक्त, मुघल काळात सौंदर्य वाढवण्यासाठी सुपारीचा वापर केला जात असे. याशिवाय नूरजहाँनेही तिच्या चेहऱ्यावर सुपारीचा वापर केला होता, ज्यामुळे तिचे सौंदर्य वाढले होते.

| Jan 09, 2024, 12:26 PM IST

Benifits of Fire Paan: Fire Paan Amazing Facts: सुपारी पान हे मुघल शासकांच्या काळापासून खाल्ले जात आहे. असे म्हटले जाते की मुघल काळात पानाला नवीन आणि देशी चव देण्यासाठी चुना, वेलची आणि लवंगा यांसारख्या गोष्टी पानात घालण्यात आल्या होत्या.

1/8

फायर पानच्या आगीने तोंड भाजू शकत का? जाणून घ्या अमेझिंग फॅक्ट्स

Benifits of Fire Paan Amazing Facts Trending Marathi News

Benifits of Fire Paan: काही लोकांना गोड फायर पान खायला आवडते. ज्यामध्ये पानाला आग लावली जाते आणि नंतर ते दिले जाते. तुम्ही कधी फायर पान चाखले आहे का? फायर पान खाल्ल्याने तोंड भाजते, असे तुम्हाला वाटते का? पानावरची आग किती वेळ राहते? तोंडात पान गेल्यावर आग कशी जळते? असे प्रश्न तुम्हाला पडतात का? मग या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.

2/8

पद्धत सामान्य पान सारखीच

 Benifits of Fire Paan Amazing Facts Trending Marathi News

फायर पान भारतातील अनेक शहरांमध्ये दिले जाते. धगधगत्या ज्वालांपासून बनवलेले हे पान आजकाल भारतात खूप लोकप्रिय होत चालले आहे. सर्व वयोगटातील लोक हे पान खाताना आपण पाहतो. ते बनवण्याची पद्धत ही सामान्य पान सारखीच असते. पण त्यावरील आग पानाला विशेष बनवते.

3/8

जळजळ जाणवत नाही

Benifits of Fire Paan Amazing Facts Trending Marathi News

आश्‍चर्यकारक गोष्ट म्हणजे फायर पान तोंडात घेतल्यानंतरही आगीची उब किंवा जळजळ जाणवत नाही. यामुळेच सर्व वयोगटातील लोकांना हे खायला आवडते. असे असले तरी काहींना या पानाबद्दलची भीती नेहमीच वाटत आलीय. त्यांच्यासाठी फायर पानाचे काही फॅक्ट्स समजून घेऊया.

4/8

आग लावण्यासाठी ठिणगीचा वापर

Benifits of Fire Paan Amazing Facts Trending Marathi News

आधी पान तयार करून मग आग लावली जाते. आग लावल्यानंतर पान विक्रेते ते तोंडात घालतात, जेणेकरून आपले हात जळू नयेत. सुपारीला आग लावण्यासाठी ठिणगीचा वापर केला जातो किंवा सुपारीच्या पानात कॅल्शियम कार्बाइड मिसळलेले असते, असे ते सांगतात. 

5/8

पान खाणाऱ्यासाठी हानिकारक

Benifits of Fire Paan Amazing Facts Trending Marathi News

जेव्हा कॅल्शियम कार्बाइड आर्द्रतेच्या संपर्कात येते तेव्हा ते ऍसिटिलीन वायू तयार करते. ज्यामुळे लहान ज्योत निर्माण होते. मात्र, त्यात कॅल्शियम कार्बाइडची काळजी घ्यावी लागते. जर जास्त प्रमाणात कॅल्शियम कार्बाइड मिसळले तर ते पान खाणाऱ्यासाठी हानिकारक ठरू शकते.

6/8

ज्योत फक्त 2-3 सेकंद

Benifits of Fire Paan Amazing Facts Trending Marathi News

जर तुम्ही असा विचार करत असाल की पान तोंडात गेल्यावरही जळत राहील तर तसे होत नाही. कारण पानाची ज्योत फक्त 2-3 सेकंद टिकते. म्हणजेच पान बनवणारा पान बनवतो आणि तोंडात घालतो तोपर्यंत आग विझते. 

7/8

पानांचा थंड प्रभाव

Benifits of Fire Paan Amazing Facts Trending Marathi News

सुपारीच्या पानांचा थंड प्रभाव असतो. त्यामुळे ते तुमच्या पचनासाठीही चांगले असते आणि ते तोंडात टाकताच त्याची आग विझते आणि पानाची थंड चव तोंडात विरघळते.

8/8

तोंडा का नाही भाजत?

Benifits of Fire Paan Amazing Facts Trending Marathi News

पानावर लावलेली अग्नी अतिशय हलकी असते. जी तोंडात गेल्यावर विझते. यामुळे तुमच्या तोंडात कोणतीही समस्या उद्भवत नाही. उलट ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये वापरल्या जाणाऱ्या लवंगामुळे घसा थंड ठेवण्यास मदत होते.