बर्फाच्छादित गुलमर्गमधून 'बर्फ'च हरवला; काश्मीरच्या खोऱ्यात हा भलताच दुष्काळ

Gulmarg Snowfall News: थंडीनं कितीही अडचणी वाढवल्या तरीही हिवाळी सहलींसाठीही अनेकांचीच पसंती या काश्मीरला असते. यंदाचं वर्षही त्याला अपवाद नव्हतं. पण, काश्मीरमध्ये मात्र परिस्थिती वेगळीच असल्याचं पाहायला मिळालं... (Kashmir Snowfall )  

Jan 09, 2024, 08:28 AM IST

Gulmarg Snowfall News: सहसा थंडीचे दिवस अर्थात, हिवाळा सुरु झाला की देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांकडे सर्वांचं लक्ष लागतं. त्यातही काश्मीरच्या खोऱ्यातील कडाक्याची थंडी म्हणजे अनेकांसाठी स्वर्ग तर काहींसाठी रक्त गोठवणारं संकट. 

1/8

पृथ्वीवरचा स्वर्ग

weather Climate change no snowfall in gulmarg shocking phoos went viral

Gulmarg Snowfall News: पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणून काश्मीरची ओळख आहे. हिवाळ्याचा ऋतू जसजसा पुढे जातो तसतसं या खोऱ्याचं सौंदर्य आणखी बहरतं आणि अनेकांनाच भारावून सोडतं. 

2/8

यंदा मात्र इथं चित्र काहीसं वेगळं

weather Climate change no snowfall in gulmarg shocking phoos went viral

हिवाळी ऋतूमध्ये स्किईंगचा आनंद घेण्यासाठीसुद्धा इथं अनेकजण येतात. पण, यंदा मात्र इथं चित्र काहीसं वेगळं आहे. कारण, एरव्ही बर्फाची चादर अच्छादलेलं गुलमर्ग यंदा मात्र याच बर्फाला आसुसलेलं पाहायला मिळत आहे. 

3/8

गुलमर्ग यंदा मात्र ओसाड

weather Climate change no snowfall in gulmarg shocking phoos went viral

दरवर्षी अडीच ते तीन फुटांचा बर्फाचा थर असणारं गुलमर्ग यंदा मात्र ओसाड असल्याचं दिसत आहे. अधिकृत आकडेवारीनुसार यंदा या भागात तब्बल 79 टक्के कमी पावसाची आणि बर्फवृष्टीची नोंद झाली आहे. 

4/8

अल निनो जबाबदार

weather Climate change no snowfall in gulmarg shocking phoos went viral

हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार या गंभीर स्थितीसाठी अल निनो जबाबदार असून, त्यामुळंच या भागात पाऊस आणि बर्फाची कमतरता पाहायला मिळत आहे. 

5/8

समुद्राच्या पृष्ठावरील तापमानात वाढ

weather Climate change no snowfall in gulmarg shocking phoos went viral

मध्य आणि पूर्व पॅसिफिक महासागरातील समुद्राच्या पृष्ठावरील तापमानात वाढ होण्याच्या स्थितीला अल निनो म्हटलं जातं. ज्यामुळं जागतिक स्तरावरील हवामान प्रभावित होत आहे.   

6/8

संपूर्ण डिसेंबर आणि आता जानेवारी कोरडा

weather Climate change no snowfall in gulmarg shocking phoos went viral

काश्मीरच्याच हवामानाविषयी सांगावं तर, इथं संपूर्ण डिसेंबर आणि आता जानेवारीच्या मध्यापर्यंत हवामान कोरडंच होचं. येत्या काळातही या स्थितीत फारसे बदल होणार नसले तरीही काही ठिकाणी बर्फवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

7/8

दीर्घ काळासाठी दुष्काळ

weather Climate change no snowfall in gulmarg shocking phoos went viral

काश्मीरच्या खोऱ्यामध्ये अल निनोचे गंभीर परिणाम दिसून येत असून, येत्या काळात इथं दीर्घ काळासाठी दुष्काळसदृश परिस्थिती उदभवू शकते अशी भीतीदायक शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 

8/8

गुलमर्गच्या ओसाड पडलेल्या डोंगररांगा

weather Climate change no snowfall in gulmarg shocking phoos went viral

हवामानानं दाखवलेलं हे विदारक रुप आणि गुलमर्गच्या ओसाड पडलेल्या डोंगररांगा आता गतकाळातील सौंदर्य लयास गेल्याची जखम मनावर ठेवून जात आहेत.