Horror Comedy पाहायला आवडते? 'भूल-भुलैया-3' पूर्वी पाहा साऊथ आणि बॉलिवूडचे 7 चित्रपट

 Best Horror Comedy Films In Bollywood & South Indian : हॉरर कॉमेडीच्या चित्रपटांचा ट्रेंड सध्या वाढत असून 2024 या एका वर्षातचं बॉलिवूडचे तीन हॉरर कॉमेडी चित्रपट रिलीज झाले आहेत. ज्याला लोकांनी सुद्धा खूप पसंती दिली. पहिले मुंज्याला प्रेक्षकांनी पसंती दिली. त्यानंतर स्त्री 2 ने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली.

| Oct 21, 2024, 18:54 PM IST
1/7

अरनमनई 4 :

जर तुम्हाला हॉरर-कॉमेडी चित्रपट पाहायला आवडत असतील तर अरनमनई हा साऊथ चित्रपट तुमच्यासाठी योग्य आहे. या साऊथ चित्रपटाचे आतापर्यंत चार भाग आले असून हे सर्वच हिट ठरले.  राशी खन्नाने अरनमनई 4 मध्ये मुख्य भूमिका साकारली होती. अरनमनई हा चित्रपट तुम्ही OTT प्लॅटफॉर्म Zee5 वर पाहू शकता. 

2/7

कॉन्ज्यूरिंग कन्नप्पन :

कॉन्ज्यूरिंग कन्नप्पन हा 2023 मध्ये रिलीज झालेला हॉरर कॉमेडी चित्रपट असून याची कथा एका अशा माणसाभोवती फिरते जो स्वतःला अडचणीत सापडतो. पण कथेत ट्विस्ट तेव्हा येतो जेव्हा त्या व्यक्तीच्या वाईट स्वप्ननांचा प्रभाव खऱ्या आयुष्यावरही होऊ लागतो. ही कथा तुम्हाला घाबरवण्यासोबतच हसायला सुद्धा भाग पडते. कॉन्ज्युरिंग कन्नप्पन हा चित्रपट तुम्ही OTT प्लॅटफॉर्म Netflix वर पाहू शकता. 

3/7

पेट्रोमॅक्स :

पेट्रोमॅक्स हा हॉरर कॉमेडी चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेत्री तमन्ना भाटिया मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटाची कथा ही मीरा नावाची स्त्री आणि तिच्या कुटुंबाभोवती फिरते. पेट्रोमॅक्स हा हॉरर कॉमेडी चित्रपट  Amazon Prime Video वर पाहू शकता. 

4/7

अनादो ब्रह्मा :

अनादो ब्रह्मा या साऊथच्या हॉरर कॉमेडी चित्रपटात तापसी पन्नू हिने मुख्य भूमिका केली असून याची गोष्ट ही अशा कुटुंबाच्या भोवती फिरते जिथे आत्माचा वास आहे. या गोष्टीत ट्विस्ट तेव्हा येतो जेव्हा घरातील लोक भूत घालवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करतात. हॉरर कॉमेडी चित्रपट अनादो ब्रह्मा हा प्रेक्षकांना ओटीटी प्लेटफॉर्म झी 5 वर पाहता येईल. 

5/7

देवी :

देवी या चित्रपटात अभिनेत्री तमन्ना भाटियाने दुहेरी भूमिका साकारली आहे. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म झी 5 वर पाहता येईल. 

6/7

भूतनाथ रिटर्न्स :

भूतनाथ रिटर्न्स हा बॉलिवूड चित्रपट 2014 मध्ये रिलीज झाला असून अमिताभ बच्चन यांनी यात मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची गोष्ट अशा मुलाभोवती फिरते ज्याला भूत दिसतं. इमोशनल ड्रामाने भरलेला हा हॉरर कॉमेडी चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टारवर पाहू शकता. 

7/7

भूतकालम :

भूतकालम या चित्रपटात शान निगम आणि रेवती हे मुख्य भूमिकेत आहे. भूतकलमच्या कथेत कुटुंबातील एका सदस्याचा मृत्यू होतो. या मृत्यूनंतर आई आणि तिच्या मुलाच्या बाबतीत विचित्र गोष्टी घडू लागतात. हा चित्रपट सोनी लिव्हवर या ओटीटी प्लेट फॉर्मवर पाहू शकता.