कुटुंबाला घेऊन बाहेर जेवायला जाताय? या रेस्तराँमधील जगात भारी बफे नक्की TRY करा

Buffets in mumbai : आता ही चिंतासुद्धा मिटेल, कारण मुंबईत राहात असाल तर खिशाला परवडेल अशा दरात तुम्ही काहीतरी भन्नाट चवीचं खाऊ शकता. चला पाहुया मुंबईतील जगात भारी बफे रेस्तराँ...  

Jul 29, 2023, 15:22 PM IST

Buffets in mumbai : सुट्टीच्या दिवशी घरात जेवण बनवायचा कंटाळा आल्यास अनेकजण सूर लगावतात, 'आज बाहेर जायचं का जेवायला?'. या प्रश्नाचं उत्तर होकारार्थीच असणार असतं. पण, त्यासाठी अनेकजण पहिला खिसा पाहतात, कारण सर्वांनाच चांगल्या ठिकाणी जेवायला न्यायचं म्हणजे बसली की फोडणी.... 

 

1/7

मुंबईतील सर्वोत्तम बफे

best Buffets in mumbai restaurant names and prices

रविवारी किंवा इतर कोणत्याही दिवशी तुम्ही या रेस्तराँमध्ये जाऊन जागतिक दर्जाचे उत्तमोत्तम पदार्थ चाखू शकता. अगदी मुंबईतल्या मुंबईत तुम्ही पार चीन, जपानपर्यंतच्या पदार्थांची चव चाखू शकता. अर्थात यात भरातीय पदार्थांचीही रेलचेल असेलच.   

2/7

तयार आहात का?

best Buffets in mumbai restaurant names and prices

साधारण 1200 ते 2000 रुपये प्रत्येकी इतक्या किमतीमध्ये तुम्ही अनलिमिटेड जेवणाचा आनंद घेऊ शकता. तयार आहात का? 

3/7

सिग्री

best Buffets in mumbai restaurant names and prices

शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारच्या पदार्थांची गर्दी सिग्रीच्या बफेमध्ये पाहायला मिळते. दोन माणसांसाठी इथं 2 हजार रुपये इतकी किंमत मोजावी लागते. 

4/7

कॉपर चिमनी

best Buffets in mumbai restaurant names and prices

मोगलाई, बिर्याणी, कबाब आणि अफलातून गोडाच्या पदार्थांची रेलचेल कॉपर चिमनीमधील बफेमध्ये पाहायला मिळते. या बफेसाठी साधारण 1600 रुपये मोजावे लागतात. 

5/7

पोट पुरी

best Buffets in mumbai restaurant names and prices

काँटिनेंटल, आशियाई, चायनिज, पिझ्झा अशा पदार्थांची रेलचेल तुम्हाला चेंबूरच्या क्युबिक मॉलमध्ये असणाऱ्या या हॉटेलमध्ये चाखता येईल. इथं तुम्हाला साधारण 2000 रुपये माणसी इतकी किंमत भरावी लागेल. 

6/7

ग्लोबल फ्यूजन

best Buffets in mumbai restaurant names and prices

जागतिक स्तरावर लोकप्रिय असणारे सुशी, टेंपुरा प्रॉन्स हे आणि अशा अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ इथं खायला मिळतात. विविध प्रकारचे सुप, डेजर्ट्सही इथं तुम्ही खाऊ शकता. इथं एका माणसासाठी साधारण 1600 रुपये भरून पोटभर जेवण जेवता येतं.   

7/7

ऑल स्टर फ्राय

best Buffets in mumbai restaurant names and prices

आशियाई खाद्यसंस्कृतीच्या प्रेमात असाल तर हा पर्याय तुमच्यासाठी Best आहे. विविध प्रकारच्या शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची रेलचेल इथं पाहायला मिळते. कुलाब्यातील या रेस्तराँमध्ये तुम्ही माणसी 780 रुपयांपासून बफेचा आनंद घेऊ शकता.