MS Dhoni Best IPL Innings: उगाच फिनिशर म्हणतात का! पाहा थाला धोनीच्या 5 बेस्ट इनिंग्स

कॅप्टन कूल आणि थाला महेंद्रसिंग धोनीला  (Mahendra Singh Dhoni) भारतीय क्रिकेटमधला सर्वात यशस्वी कर्णधार (Most successful captain) म्हणून ओळखलं जातं. महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) एक वेगळी ओळख क्रिकेट विश्वात निर्माण केली आहे ती म्हणजे, एक उत्तम आणि यशस्वी फिनिशर अशी. धोनीने आजवर कित्तेक सामना जिंकवले आहेत. मात्र, धोनीच्या आयपीएलमधल्या टॉप 5 फिनिशिंग खेळी कोणत्या होत्या? माहितीये का?

Apr 19, 2023, 22:42 PM IST

Best finishing innings of MS Dhoni: कॅप्टन कूल आणि थाला महेंद्रसिंग धोनीला  (Mahendra Singh Dhoni) भारतीय क्रिकेटमधला सर्वात यशस्वी कर्णधार (Most successful captain) म्हणून ओळखलं जातं. महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) एक वेगळी ओळख क्रिकेट विश्वात निर्माण केली आहे ती म्हणजे, एक उत्तम आणि यशस्वी फिनिशर अशी. धोनीने आजवर कित्तेक सामना जिंकवले आहेत. मात्र, धोनीच्या आयपीएलमधल्या टॉप 5 फिनिशिंग खेळी कोणत्या होत्या? माहितीये का?

1/5

मुंबईचा बदला घेतला

महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) आयपीएलमध्ये सुद्धा अनेक खेळात फिनिशर म्हणून भूमिका बजावली आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध आयपीएलच्या 15 व्या हंगामात महेंद्रसिंग धोनीने 13 चेंडूत 28 धावांची इनिंग खेळली होती आणि मॅचच्या शेवटच्या ओव्हरमध्ये चेन्नईला 17 धावांची गरज होती आणि महेंद्रसिंग धोनीने दोन चौकार आणि एक षटकार मारून मॅच चेन्नईला जिंकून दिली.

2/5

दिल्लीचा उडवला धुव्वा

आयपीएल 2021 च्या क्वालीफायर मॅचमध्ये महेंद्रसिंग धोनीने पुन्हा फिनिशरची भूमिका दिल्ली कॅपिटल्सच्या विरोधात बजावली आणि 6 चेंडूत 18 धावा करत चेन्नईला विजय मिळवून दिला होता.

3/5

बंगळुरूला लोळवलं

आयपीएल 2018 मध्ये बंगळुरूने चेन्नईला 206 धावाचं आव्हान दिला होत त्या सामन्यात महेंद्र सिंग धोनीने 34 चेंडूत 70 धावा करत चेन्नईला विजय मिळवून दिला होता.

4/5

पंजाबविरुद्ध सामना जिंकवला

आयपीएल 2016 ला महेंद्रसिंग धोनी रायसिंग पुणे सुपर जायंट्स या संघातून खेळा होता. किंग्स इलेवन पंजाबच्या विरुद्ध सामन्यात खेळात असताना टीमला शेवटच्या 3 चेंडूत 16 धावांची आवशकता होती तेव्हा धोनीने दमदार फलंदाजी करत 3 चेंडूत 4, 6 ,6 मारून मॅच जिंकून दिली.

5/5

हैदराबादला धुतलं

आयपीएल 2013 साली हैदराबाद विरोधात धोनीने 37 चेंडूत 67 धावा करत चेन्नईला विजय मिळवून दिला आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 15 रन्स करून टीमला विजय मिळवून दिला.