Sachin tendulkar : आता तेंडुलकरांकडेही आयपीएलची विकेट; अर्जुनच्या पहिल्या विकेटनंतर सचिनची खास प्रतिक्रिया

Sachin tendulkar : गेल्या 3 वर्षांपासून सचिन तेंडुलकरचा (Sachin tendulkar) मुलगा जे स्वप्न पाहत होता, अखेर ते हैदराबादविरूद्धच्या सामन्यात पूर्ण झालं आहे. 

Apr 19, 2023, 21:35 PM IST
1/5

मंगळवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने विजयाची हॅट्रिक केली, तर मुंबईचा नवखा खेळाडू अर्जुन तेंडुलकरने पहिली विकेट देखील घेतली.

2/5

अर्जुनने शेवटच्या ओव्हरमध्ये भुवनेश्वर कुमारची विकेट घेतली. अर्जुनची ही आयपीएलच्या करियरमधील पहिली विकेट होती. 

3/5

दरम्यान अर्जुनने पहिली विकेट घेतल्यानंतर सचिन तेंडुलकर फार खुश झाला. यावरून त्याने मुलासाठी एक खास ट्विट देखील केलं आहे. 

4/5

सचिन त्याच्या ट्विटमध्ये म्हणतो की, मुंबई इंडियन्सकडून पुन्हा एकदा चांगली कामगिरी. कॅमेरून ग्रीनने बॉल आणि बॅट दोन्हीवर प्रभाव टाकला. इशान आणि तिलक यांनीही उत्तम फलंदाजी केली. आणि आता अखेर तेंडुलकरांनाही आयपीएलची पहिली विकेट मिळाली आहे.

5/5

मुख्य म्हणजे अर्जुनने भुवनेश्वरची विकेट काढून सचिनचा एक प्रकारे बदला घेतला आहे. 14 वर्षांपूर्वी भुवनेश्वरने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) ला रणजी ट्रॉफीच्या सामन्यामध्ये शून्यावर बाद केलं होतं. मुख्य म्हणजे भुवनेश्वर कुमार हा पहिला असा गोलंदाज होता, ज्याने सचिनला रणजीमध्ये शुन्यावर आऊट केलं होतं