पावसाळ्यात ट्रेकला जाऊन कंटाळला असाल तर महाराष्ट्रातील 'या' लेण्यांना नक्की भेट द्या

Maharashtra Caves In Mansoon: लेण्या म्हटलं की, अंजिठ्याची लेणी, कार्ला लेणी, घारापुरी लेणी या प्रसिद्ध लेण्या डोळ्यांसमोर येतात. मात्र महराष्ट्रात अशा काही लेण्या आहेत जिथे पर्यटक अजूनही पोहोचलेले नाहीत. 

Jun 27, 2024, 16:48 PM IST
1/16

पावसाळा म्हटलं की,समुद्र किनारा आणि ट्रेकला जाणं हे बऱ्याच जणांचं ठरलेलं असतं. पण जर तुम्ही दरवर्षी  ट्रेकला जाऊन कंटाळला असाल तर, ही माहिती खास तुमच्यासाठी आहे. 

2/16

लेणी म्हणजे काय ?

टेकडी, डोंगर किंवा पर्वत फोडून गुहा तयार केली जात असे, या गुहेत कोरीव काम केलं जायचं. या गुहांमध्ये कातळशिल्प आणि त्या त्या विशिष्ट संस्कृतीच्या खुणा असतं. छ. संभाजीनगरातील अजिंठा आणि मुंबईतील कान्हेरी, घारापुरी या लेण्या जगप्रसिद्ध आहेत. असं म्हणतात की, महाराष्ट्रात एकूण 800 लहान मोठ्या लेण्या आहेत. याच काही लेण्यांची माहिती जाणून घेऊयात.   

3/16

बहरोट लेणी

वसई-विरार पासून जवळच डहाणू येथे बहरोत लेणी आहे.बोर्डी गावापासून काही अंतरावर ही बुद्धकालीन लेणी आहे. महाराष्ट्र-गुजरात सीमेवर या लेणीचा विस्तार आहे.

4/16

 या लेणीमध्ये 7 जलकुंड असून येथील फारसी धर्मातील मंदिर स्थापत्त्य कलेचा उत्तम देखावा आहे.   

5/16

बेडसे लेणी, मावळ

पुण्यातील मावळ तालुक्यातील बेडसे लेणी ही फार प्रसिद्ध नसल्याने इथे पर्यटकांची गर्दी नसते. त्यामुळे या लेणीच्या आजूबाजुचा परिसर शांत आहे. 

6/16

कामशेत पासून जवळ असलेल्या या लेणीमध्ये हत्ती, घोडा, बैल आणि मानवी नातेसंबंध दर्शवणारे स्त्री-पुरुषाचे रेखाटन इथल्या दगडांवर केलं आहे. 

7/16

भाजा लेणी, मावळ

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरुन जाताना भाजा लेणी दिसते. बुद्धकालीन स्थापत्यशैलीचा हा उत्तम नमुना आहे. 

8/16

दगडांवर कोरलेली बुद्धांची चित्रं, सत्ताविस अष्टकोनी खांब त्यावर कमळाच्या फुलाच्या आकाराची विविध चित्र रेखाटली आहेत. 

9/16

भटाळा लेणी

तडोबा जंगल हे चंद्रपुरमधील प्रसिद्ध ठिकाण आहे. मात्र असं असलं तरी चंद्रपुरमधील मन वेधून घेणारं आणखी एक ठिकाण म्हणजे, भटाळा लेणी. 

10/16

ही बुद्धकालीन लेणी असली तरी, या परिसरात प्रचीन शिवमंदिर, शिव पार्वतीच्या खुणा देखील पहायला मिळतात. बौद्ध आणि हिंदू या दोन्ही धर्माची साक्ष देणारी भटाळी लेणी कायमच इतिहासप्रेमींच्या आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरते. 

11/16

कु़डा लेणी

श्रीवर्धन दिवेआगारजवळच कुडा लेणी आहे. रायगडच्या पर्यटनातील ही जागा फार  परिचयाची नाही. राजापुरच्या खाडीजवळ असलेल्या परिसरात मांदाड बंदर आहे.या ठिकाणी  सातवाहनाच्या काळात साामंत महाभोज याचं साम्राज्य होतं

12/16

अशी इतिहासात नोंद आहे. या लेणीमध्ये 5 चैत्यगृह आणि 21 विहार आहेत. रोहा स्टेशनवरुन तुम्ही मुरुड बसने कुडा गावी जाऊ शकता.   

13/16

महाकाली लेणी

कान्हेरी गुंफा, एलिफंटा लेणी आणि घारापुरी लेणी या मुंबईतील प्रसिद्घध लेण्या म्हणून ओळखल्या जातात. मात्र याच ठिकाणांहून जवळ असलेल्या महाकाली लेणीचा इतिहास देखील तितकाच रहस्यमय आहे. 

14/16

मुंबईच्या पश्चिम टोकाला ही लेणी आहे. या लेणीमध्ये 19 गुहा आहे. या गुहेत पाली भाषेतील शिलालेख पाहायला मिळतात.

15/16

शिवथरघळ लेणी

महाडपासून काही जवळच असलेल्या या लेणीला निसर्ग सौंदर्याचं वरदान लाभलेलं आहे. त्याचबरोबर या लेणीला धार्मिक महत्त्व देखील मोठे आहे. वाघजई दरीच्या कुशीत श्री रामदास स्वामी यांचं आश्रम होतं. 

16/16

 याच ठिकाणी रामदास स्वामी यांनी दासबोध ग्रंथ रचला होता, असं म्हणतात. छत्रपती शिवरायांनी दक्षिणेच्या मोहिमेवर जाताना याच ठिकाणी रामदास स्वामींचं दर्शन घेतलं होतं. अशी इतिहासात नोंद आहे. या लेणीशी छत्रपती शिवरायांचा जवळचा संबंध असल्यामुळे बरेच शिवप्रेमी या ठिकाणाला भेट द्यायला येतात.