रॉयल इन्फिल्ड नव्हे, 'ही' आहे देशातील सर्वात विकली जाणार बाईक

Best selling Bike Company: तरुणांमध्ये बाईक्सची खूप क्रेझ असते. कोणती बाईक आपल्याला चांगले मायलेज देईल, कोणती बाईक लूकला चांगली असेल? आपल्या बजेटमध्ये कोणती बाईक असेल? असे अनेक प्रश्न तरुणांना असतात. दरम्यान सर्वाधिक मागणी असलेली बाईक कोणती याबद्दल जाणून घेऊया. 

| Aug 04, 2023, 16:06 PM IST

Best selling Bike Company: तरुणांमध्ये बाईक्सची खूप क्रेझ असते. कोणती बाईक आपल्याला चांगले मायलेज देईल, कोणती बाईक लूकला चांगली असेल? आपल्या बजेटमध्ये कोणती बाईक असेल? असे अनेक प्रश्न तरुणांना असतात. दरम्यान सर्वाधिक मागणी असलेली बाईक कोणती याबद्दल जाणून घेऊया. 

1/6

हिरो मोटर कॉप

Hero MotoCorp

Hero MotoCorp पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांनी जुलै 2023 मध्ये देशांतर्गत बाजारात 3 लाख 71हजार 204 युनिट्सची विक्री केली आहे, विक्रीत 13.8 टक्के आणि MoM मध्ये 12.1 टक्के घट नोंदवली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत त्याची विक्री 4 लाख 30 हजार 684 युनिट्स होती.  

2/6

होंडा मोटारसायकल

Honda Motorcycle

होंडा मोटारसायकल अॅण्ड मोटर इंडिया दुसर्‍या क्रमांकावर आहे. त्यांच्या विक्रीत वार्षिक आधारावर 12.5 टक्क्यांनी घट झाली. जुलै 2023 मध्ये 3 लाख 10 हजार 867 युनिट्सची विक्री झाली. गेल्यावर्षी याच कालावधीत त्याची देशांतर्गत विक्री 3 लाख 55 हजार 560 युनिट्स होती. तथापि, MoM आधारावर त्यात 2.6 टक्के वाढ नोंदवली गेली.  

3/6

टीव्हीएस मोटर कंपनी

TVS Motor Company

TVS मोटर कंपनी तिसऱ्या क्रमांकावर आहे. यावर्षी जुलैमध्ये तिने 2 लाख 35 हजार 230 युनिट्सची विक्री केली आहे, वार्षिक आधारावर 16.4 टक्के वाढ नोंदवली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत त्यांची देशांतर्गत विक्री 2 लाख 01 हजार 942 युनिट्स होती. असे असले तरी MoM आधारावर त्यांच्या विक्रीत किंचित घट झाली.

4/6

बजाज ऑटो

Bajaj Auto

बजाज ऑटो चौथ्या क्रमांकावर आहे. त्यांनी जुलै 2023 मध्ये 1 लाख 41 हजार 990 युनिट्स विकल्या आहेत. त्यांची देशांतर्गत विक्री YoY आधारावर 13.6 टक्के आणि MoM आधारावर 14.6 टक्क्यांनी घटली.

5/6

सुझुकी मोटारसायकल इंडिया

Suzuki Motorcycle India

सुझुकी मोटरसायकल इंडिया पाचव्या क्रमांकावर आहे. तिने जुलै 2023 मध्ये आतापर्यंतची सर्वाधिक मासिक विक्री नोंदवली आहे. कंपनीने गेल्या महिन्यात 80,309 युनिट्सची विक्री केली आणि तिच्या विक्रीत 31.8 टक्के (YoY) आणि 27.3 टक्के (MoM) वाढ नोंदवली.

6/6

रॉयल इन्फिल्ड

Royal Enfield

सहाव्या क्रमांकावर रॉयल एनफिल्ड आहे, ज्याच्या देशांतर्गत विक्रीत मोठी वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात कंपनीने 66,062 रॉयल इन्फिल्डची विक्री केली आहे. त्याची विक्री वार्षिक आधारावर 41.9 टक्क्यांनी वाढली आहे परंतु MoM आधारावर 2.1 टक्क्यांनी घट नोंदवली आहे.