मुंबईतला वेटर ते चीनमधला Movie Star... भारतीयाचा प्रेरणादायी प्रवास; 8 हॉटेल्सचाही आहे मालक!

Waiter In Mumbai To A Movie Star In China : तुमच्याकडे कौशल्य असेल तर तुम्हाला उशीरा का असेना यश मिळतं. अर्थात यासाठी थोडा अधिक संघर्ष करावा लागतो पण यश नक्की मिळतं. अशीच काहीशी कथा आहे एका भारतीयाची जो भारतात फारसा लोकप्रिय नसला तरी चिनी चित्रपटांमधील सुपरस्टार आहे. वेटर म्हणून काम करणारा आणि सध्या अभिनेता असलेला हा भारतीय तिथे इतका प्रसिद्ध आहे की त्याच्या संघर्षाची कथा सातवीच्या पाठ्यपुस्तकामध्ये शिकवली जाते. जाणून घेऊयात त्याच्याबद्दल...

| Aug 04, 2023, 15:40 PM IST
1/20

Dev Raturi Waiter In Mumbai To A Movie Star In China

भारतामध्ये एकेकाळी वेटर म्हणून काम करणारा एक भारतीय तरुण भारतीय आज चीनमधील घराघरातील ओळखीचा चेहरा झाला आहे. या व्यक्तीचं नाव आहे देव रतुरी!

2/20

Dev Raturi Waiter In Mumbai To A Movie Star In China

देव खरं तर एक उद्योगपती आहे. पदेशात त्याची एकूण 8 रेस्तराँरंट आहेत.

3/20

Dev Raturi Waiter In Mumbai To A Movie Star In China

देवने आतापर्यंत अनेक चिनी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 

4/20

Dev Raturi Waiter In Mumbai To A Movie Star In China

आज देव हा चीनमधील चित्रपट सृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता म्हणून ओखळला जातो. देवचा इथपर्यंतचा प्रवास फारच कठीण आणि खडतर होता.

5/20

Dev Raturi Waiter In Mumbai To A Movie Star In China

देव हा चीनमध्ये इतका लोकप्रिय आहे की तेथील सातव्याच्या पाठ्यपुस्तकामध्ये त्याच्या संघर्षावर एक धड्याचा समावेश करण्यात आला आहे. त्याच्या संघर्षातून आज चिनी मुलं प्रेरणा घेत आहेत.

6/20

Dev Raturi Waiter In Mumbai To A Movie Star In China

सध्या देव त्याच्या उत्तराखंडमधील मूळ गावी केमरया सौडमध्ये सुट्ट्यांसाठी आला आहे. टिहरी जिल्ह्यामधील भिलंगना ब्लॉकमध्ये असलेल्या याच गावात 47 वर्षांपूर्वी देवचा जन्म झाला होता. 

7/20

Dev Raturi Waiter In Mumbai To A Movie Star In China

देवचं शिक्षण राजकीय इंटर कॉलेज चमियाला (लाटा) येथे झालं. दहावीपर्यंत इथं शिक्षण घेतल्यानंतर 1998 मध्ये देव नोकरीच्या शोधात दिल्लीला गेला. 

8/20

Dev Raturi Waiter In Mumbai To A Movie Star In China

अभिनेता होण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या देवनं कला क्षेत्रात संधी मिळावी म्हणून तो मार्शल आर्ट शिकला. त्यानंतर तो मुंबईला आला. 

9/20

Dev Raturi Waiter In Mumbai To A Movie Star In China

8 वर्ष देव मुंबईमध्ये राहून हॉटेलमध्ये वेटर म्हणून नोकरी करायचा.

10/20

Dev Raturi Waiter In Mumbai To A Movie Star In China

वेटर म्हणून नोकरी करतानाच त्याने काही टीव्ही मालिकांमध्ये आणि नाटकांमध्ये काम केलं.  

11/20

Dev Raturi Waiter In Mumbai To A Movie Star In China

मागील 18 वर्षांपासून देव पत्नी अंजली आणि 2 मुलांसहीत चीनमध्ये वास्तव्यास आहे.

12/20

Dev Raturi Waiter In Mumbai To A Movie Star In China

आतापर्यंत देवने 35 चिनी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 

13/20

Dev Raturi Waiter In Mumbai To A Movie Star In China

देव मुंबईमधून वेटर म्हणून काम करण्यासाठी चीनमध्ये गेला होता. मात्र आज तो तेथील प्रसिद्ध अभिनेता आहे. आता त्याला भारतीय चित्रपटांमध्ये काम करायचं आहे.

14/20

Dev Raturi Waiter In Mumbai To A Movie Star In China

देव हा चीनमधील मनोरंजन सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता असून त्याने अनेक चिनी नाटकं आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

15/20

Dev Raturi Waiter In Mumbai To A Movie Star In China

माय रुममेट इज डिटेक्टीव्ह आणि द ट्रॅप्ड यासारख्या नाटकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये देवने अभिनय केला आहे.  

16/20

Dev Raturi Waiter In Mumbai To A Movie Star In China

देवने 2013 मध्ये चीनमध्ये पहिलं भारतीय रेस्तराँरंट सुरु केलं. सध्या त्याच्या नावावर 8 रेस्तराँरंट आहेत.

17/20

Dev Raturi Waiter In Mumbai To A Movie Star In China

देवच्या मालकीच्या या 8 हॉटेल्समधील 50 हून अधिक कर्मचारी हे उत्तराखंडमधील आहेत.

18/20

Dev Raturi Waiter In Mumbai To A Movie Star In China

सध्या देव हा चीनमध्ये अभिनेता आणि उद्योजक म्हणूनही ओळखला जातो. 

19/20

Dev Raturi Waiter In Mumbai To A Movie Star In China

आपल्या भारतीय रेस्तराँरंटमध्ये अगदी उत्साहाने भारतीय सणवार साजरे केले जातात असं देव सांगतो.

20/20

Dev Raturi Waiter In Mumbai To A Movie Star In China

देवच्या रेस्तराँरंटमधील वेटर्सचे कपडेही भारतीय संस्कृतीप्रमाणेच आहेत.