तुम्हालाही वाटते भीती, तर चुकूनही पाहू नका 'हे' 5 दाक्षिणात्य चित्रपट; यांच्यासमोर बॉलिवूड आणि हॉलिवूडही Fail

सध्या सगळ्या प्रेक्षकांमध्ये दाक्षिणात्य चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे. दाक्षिणात्य चित्रपटातील अनेक चित्रपट हे सुपरहिट ठरले आहेत. ज्यांनी फक्त आपल्याच देशात नाही तर जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. इतकंच नाही तर दाक्षिणात्य चित्रपटांचे काही बॉलिवूड रीमेक देखील हिट झाले. त्यात 'दृश्यम' आणि 'भूलभुलैया' हे चित्रपट आहेत. आज आपण अशाच काही चित्रपटांविषयी जाणून घेणार आहोत. त्यातील असे काही 5 गाजलेले चित्रपट दिले आहेत. ज्याची क्रेझ फक्त बॉलिवूड नाही तर हॉलिवूडमध्ये देखील आहे. हे 5 असे चित्रपट आहेत जे पाहिल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य झाले आणि नक्कीच घाबराल...

| Aug 22, 2024, 15:32 PM IST
1/7

2020 मध्ये असाच एक सस्पेंस-थ्रिलर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं नाव 'फॉरेंसिक' असं आहे. या चित्रपटाची पटकथा ही प्रेक्षकांना प्रचंड आवडली. त्याचं कारण म्हणजे त्यात दाखवण्यात आलं की कशा प्रकारे फॉरेंसिक एक्सपर्ट गुन्हेगाराला पकडतो. या चित्रपटाची पटकथा ही सीरियल किलिंगवर आधारीत आहे. 

2/7

या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे की कशा प्रकारे एक फॉरेंसिक एक्सपर्ट एका एका सुगाव्याचा शोध लावतो. तर याच चित्रपटावर 2022 मध्ये रिमेक बनवण्यात आला होता. हा विक्रांत मैसीचा चित्रपट असून त्याचं नाव 'फॉरेंसिक' असं आहे. 

3/7

2015 मध्ये प्रदर्शित झालेला 'रंगीतरंगा' या चित्रपटाची पटकथा ही एका लेखकाच्या अवती-भोवती फिरते. तिला कसे भयानक स्वप्न येतात. या महिलेच्या आयुष्यात ज्या चित्र-विचित्र घटना घडतात. त्याचा संबंध तिच्या मागच्या आयुष्यातील नवऱ्याशी जोडलेला असतो. या चित्रपटाची पटकथा ही पाहून तुम्हाला कळणारच नाही नक्की काय होतंय. तर हा चित्रपट तुम्ही एमएक्स प्लेयरवर पाहू शकता. 

4/7

2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या आर माधवन आणि विजय सेतुपतीच्या 'विक्रम वेधा' या चित्रपटाचा गेल्या वर्षीच हिंदी रिमेक बनवण्यात आला होता. या चित्रपटाच्या रिमेकमध्ये हृतिक रोशन आणि सैफ अली खान हे महत्त्वाच्या भूमिकेत होते. 

5/7

सगळ्यात लक्ष वेधी गोष्ट म्हणजे रिमेकनं बॉक्स ऑफिसवर काही चांगली कमाई केली नाही. पण मुळ चित्रपटानं प्रेक्षकांची मने जिंकली. तर तुम्ही हा चित्रपट एमएक्स प्लेअरवर पाहू शकता. 

6/7

2017 मध्ये प्रदर्शित झालेला सस्पेंस थ्रिलर चित्रपट 'मायावन' मध्ये जॅकी श्रॉफनं देखील महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाची पटकथा ही एका पोलिस अधिकाऱ्याच्या अवतीभोवती फिरताना दिसते. त्यात तो एक मर्डर मिस्ट्री शोधताना दिसतो. पण हे सगळं एक सीरियल किलरवर अवलंबून असतं. पण जेव्हा सत्य समोर येतं तेव्हा सगळ्या प्रेक्षकांना आश्चर्य होतं. हा चित्रपट तुम्ही हॉटस्टारवर पाहू शकतात.   

7/7

'धुरुवंगल पथिनारु' हा एक क्राईम थ्रिलर चित्रपट आहे जो 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात रहमान मुख्य भूमिकेत दिसला. या चित्रपटाला चित्रपट समिक्षकांकडूनही चांगली प्रतिक्रिया मिळाली आहे. चित्रपटाची पटकथा ही एका हत्येवर आहे. ज्याची गुंथा ही सुटता सुटत नाही. हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.