तुम्हालाही होतोय खूप Stress? तर तणावापासून सुटका मिळवण्याचे 6 उपाय

ताणतणाव हा आजकालच्या जीवनाचा एक भाग झाला आहे. परंतु आपण आपल्या दैनंदिन जीवनाचं योग्य नियोजन केलं तर आपण त्यावर मात करू शकतो, म्हणूनच आज या तणावावर नियंत्रण करण्याच्या 6 पद्धती जाणून घेणार आहोत. 

| Jul 18, 2024, 16:21 PM IST
1/7

मेडिटेशन

ध्यान हे एक तणाव नष्ट करण्याचं सगळ्यात चांगलं साधन आहे .  JAMA Internal Medicine या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, ध्यान म्हणजेच मेडिटेशन केल्यानं मानसिक तणावाची लक्षणे कमी होऊ शकतात. 

2/7

व्यायाम

व्यायाम हा तणाव कमी करण्याचं उत्तम साधना आहे. शारीरिक हालचालींमुळे मेंदूतील एंडोर्फिन, रसायनांचं उत्पादन वाढतं जे नैसर्गिक वेदनाशामक आणि मूड एलिव्हेटर म्हणून काम करतात. व्यायामामुळे शरीराची एकूणच तणावाची पातळी कमी होते. 

3/7

निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवा

निसर्गात वेळ घालवल्याने तणावाची पातळी मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. एखाद्या गार्डनमध्ये किंवा मोकळ्या मैदानात फक्त 20 मिनिटे घालवल्याने तुमचे आरोग्य सुधारू शकते.   

4/7

योग्य आहार

निरोगी, संतुलित आहार घेतल्यानं तणावाचं व्यवस्थापन करण्यास मदत होते. मासे ओमेगा 3 आणि फॅटी अॅसिडचे प्रमुख स्त्रोत आहेत. फळे आणि भाज्यांमध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट्स यांसारखे पोषक तत्व तणावाचं नियमन करण्यात मदत करतात.

5/7

दीर्घ श्वास

डायाफ्रामॅटिक ब्रीथिंग म्हणजे दीर्घ श्वासोच्छवासामुळे शरीरातील पॅरासिम्पेथेटिक मज्जासंस्था सक्रिय होण्यास मदत होते. जे विश्रांतीस प्रोत्साहन देते. सायकोफिजियोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असं दिसून आलं आहे की मोठा श्वास घेतल्यानं शरीरातील तणाव कमी होतो आणि शांतता वाढते.

6/7

अरोमाथेरपी

तणाव कमी करण्यासाठी अरोमाथेरपीदेदेखील एक उत्तम उपाय आहे. लॅव्हेंडर, कॅमोमाइल आणि गुलाब यांसारख्या सुगंधांमुळे तणावाची पातळी कमी होते. मूड सुधारण्यास मदत होते.

7/7

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)