पहिला पगार 7000, सिनेसृष्टीत येताच जिंकले अनेक पुरस्कार, या टॉप अभिनेत्रीला ओळखलं का?

बॉलिवूडची हॉट आणि सौंदर्य क्वीन अभिनेत्री जिने दमदार अभिनयातून जिंकली अनेकांची मने. कोण आहे ही टॉप अभिनेत्री? जाणून घ्या सविस्तर 

Jul 18, 2024, 15:58 PM IST
1/7

7 हजार पगार

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री सौंदर्यासोबत अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करत असतात. अशीच एक अभिनेत्री आहे, तिला सुरुवातीला 7 हजार पगार होता. त्यानंतर तिने सिनेसृष्टीत प्रवेश केला आणि अनेक पुरस्कार जिंकले. 

2/7

कोण आहे ती अभिनेत्री?

पहिल्याच बॉलिवूड चित्रपटापासून अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री भूमी पेडणेकर. आज तिचा 35 वा वाढदिवस साजरा केला जात आहे. 

3/7

'दम लगा के हईशा'

भूमी पेडणेकरच्या अभिनय कारकिर्दीला 2015 मध्ये सुरुवात झाली. 'दम लगा के हईशा' या चित्रपटात तिच्यासोबत आयुष्मान खुराना दिसला होता. 

4/7

जिंकले अनेक पुरस्कार

या चित्रपटासाठी अभिनेत्री चक्क 12 किलो वजन वाढवले होते. चित्रपटातील अभिनयासाठी तिला फिल्मफेअर, स्टारडस्ट, झी सिने अवॉर्ड्स, आईफा अवार्ड्स जिंकले आहेत.

5/7

'बँड बाजा बारात'

'बँड बाजा बारात' या चित्रपटासाठी भूमीने रणवीर सिंगसह चित्रपटातील इतर अनेक कलाकारांसोबत ऑडिशन दिले होते. त्यावेळी त्यांना 7 हजार मानधन देण्यात आहे होते. 

6/7

कोणत्या चित्रपटात केलं काम

भूमी पेडणेकरने आतापर्यंत टॉयलेट एक प्रेम कथा, शुभ मंगल सावधान, बाला, पति पत्नी और वो, सांड की ऑंख आणि बधाई दो अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 

7/7

अभिनेत्रीची संपत्ती किती?

अभिनेत्री भूमी पेडणेकर ही जवळपास 15 कोटोंची मालक आहे. अभिनेत्री एका चित्रपटासाठी 2 ते 3 कोटी रुपये मानधन घेत असल्याची माहिती समोर येत आहे.