सुषमा स्वराज यांचे हजरजबाबी ट्विट पाहाच

Aug 07, 2019, 12:48 PM IST
1/7

भाजपाच्या दिग्गज नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री १० वाजून ५० मिनीटांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. एम्समध्ये भरती होण्याच्या काही तासांपूर्वी त्यांनी ट्विटरवरुन जम्मू-काश्मीरमधून आर्टिकल ३७० आणि ३५ अ रद्द केल्यानंतर मोदी सरकारचे अभिनंदन करत ट्विट केलं होतं. 

2/7

यात त्यांनी 'पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमचं हार्दिक अभिनंदन. मी माझ्या जीवनात हा दिवस पाहण्याची आतुरतेने वाट पाहत होते' असं ट्विट त्यांनी केलं होतं. त्यांच्या या ट्विटला आतापर्यंत लाखो लोकांनी लाइक केलं असून अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

3/7

सुषमा स्वराज यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेकांची मदत केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना अडचणीतून बाहेर काढलं आहे. सुषमा स्वराज यांचे ट्विटवर अनेक फोलॉवर्स आहेत. सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असायच्या. ट्विटरवरुन त्या अनेकांच्या प्रश्नांना प्रतिक्रिया देत त्यांची मदतही करायच्या.

4/7

मलेशियामध्ये एका भारतीय व्यक्तीने मार्च महिन्यात आपल्या मित्राला भारतातून परत आणण्यासाठी परराष्ट्र मंत्री स्वराज यांच्याकडे मदत मागितली होती. पण त्याने मदतीसाठी केलेल्या ट्विटमध्ये व्याकरणासंबंधी अनेक चुका होत्या. त्यावर एका व्यक्तीने त्याला हिंदी किंवा पंजाबीमध्ये लिहिण्याचं सांगितलं. त्यावर स्वराज यांनी, 'काहीच अडचण नाही. परराष्ट्र मंत्री बनल्यानंतर, मी सर्व प्रकारच्या इंग्रजीचे उच्चारण आणि व्याकरण शिकली असल्याचं' म्हटलं होतं.

5/7

माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना मार्च २०१९ मध्ये एका व्यक्तीने ट्विट करत प्रश्न विचारला होता की, तुम्ही परराष्ट्र मंत्री आहात, तर तुम्ही तुमच्या नावासह 'चौकीदार' या शब्दाचा उपयोग का करताय? या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी, 'कारण, मी भारतीयांच्या हितासाठी आणि विदेशात भारतीय नागरिकांसाठी चौकीदारी करते. त्यासाठी माझ्या नावापुढे 'चौकीदार' शब्द वापरत असल्याचं' त्यांनी सांगितलं.

6/7

सुषमा स्वराज नेहमीच त्यांच्या सर्वोत्कृष्ट कामासाठी, जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आणि हजरजबाबीपणासाठी ओळखल्या जातात. एका ट्विटर युजरने उपरोधिकपणे ट्विट करत सुषमा स्वराज यांच्याकडे मदत मागितली. मी मंगळ ग्रहावर अडकलो आहे. माझी मदत करा. या ट्विटवर प्रतिक्रिया देत सुषमा यांनी, 'तुम्ही मंगळ ग्रहावरही अडकला असाल तरी भारतीय दुतावास तुमची मदत करतील' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

7/7

एका ट्विटर यूजरने सुषमा स्वराज यांच्याकडे फ्रिज खराब झाल्याबाबत मदत मागितली होती. त्यावर सुषमा यांनी 'मी फ्रिजसंबंधी तुमची मदत करु शकत नाही, कारण आता मी, अडचणीत असणाऱ्या आणि ज्यांना माझी खरंच गरज आहे, अशा लोकांना मदत करण्यात व्यस्त असल्याची' प्रतिक्रिया दिली होती.